कार्यक्रमाच्या शेवटी भैरवीवरील नृत्यातील शेवटची गिरकी घेऊन त्या खाली कोसळल्या आणि रंगभूमीवरच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांचे शनिवारी रात्री पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुण्यातील भरत नाट्य मंदिरात ‘त्रिधारा’ या नाटकाचा प्रयोग सुरू असताना एकबोटे यांना ह्रदयविकाराचा झटका आला.

‘या’ कलाकारांचा अकाली मृत्यू चटका लावून गेला

IPL 2024 Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: स्वप्नातही आरसीबीला हरवण्याचा विचार करणाऱ्या गंभीरनेच केलं विराटच्या संघाचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाला
shashikant shinde, opposition false corruption allegations, mahesh shinde, shashikant shinde criticise mahesh shinde, satara lok sabha seat, ncp sharad pawar, sharad pawar, lok sabha election 2024,
सातारा: भ्रष्टाचार केला असता तर केव्हाच भाजपमध्ये गेलो असतो- शशिकांत शिंदे
Secret History of the First Microprocessor
चिप-चरित्र : पहिली ‘बहुउद्देशीय’ चिप!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

‘एका क्षणात’, ‘त्या तिघांची गोष्ट’ ही त्यांचे नाटके गाजली. दरम्यान, व्यावसायिक रंगभूमीवर येण्यापूर्वी अश्विनी यांनी प्रायोगिक हौशी रंगभूमीवर काम केलं होतं. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करण्याच धाडस करताना त्यांना अभिनेता शरद पोंक्षे यांची साथ मिळाली. १३-१४ वर्षांपूर्वी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करण्यापूर्वी अश्विनी यांनी एक फोटोशूट केले होते. हे त्यांचे पहिलेच फोटोशूट असावे. याविषयी स्वतः अश्विनी यांनी फेसबुकद्वारे माहिती दिली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या या फोटोशूटबाबत पोस्ट केलेली. त्यासोबत त्यांनी त्या फोटोशूटचे फोटोही पोस्ट केले होते. अश्विनी यांनी पोस्टमध्ये लिहलेले की,  ‘१३-१४ वर्षापूर्वीच फोटो शूट, अतुल शिधएने केलं होतं…….. गंमत असते.. काहीही माहित नव्हतं… प्रायोगिक हौशी रंगभूमीवर खूप काम केलं होत. पण व्यावसायिक रंगभूमीवर यायचा विचार करण्याच धाडस जेव्हा केल तेव्हाच हे पहिलं पाऊल. माझा मित्र ,शरद पोंक्षेनी सांगितल म्हणून केल नाहीतर मला माहित देखील नव्हत असं करावं लागत वगैरे. आणि अतुलने खूप प्रामाणिकपणे केलं… दोघांचेही आभार .. आणि धन्यवाद… इथून सुरुवात झाली… अजून खूप लांब जायचयं…’

एक अदाकारा..

ashwini-ekbote-1

अश्विनी एकबोटे यांच्या या पोस्टचा शेवट याक्षणी भावूक करणारा आहे. सदर फोटोशूटनंतर त्यांनी जवळपास १४ वर्ष रंगभूमीवर काम केलं. काल संध्याकाळी भरत नाट्य मंदिरात संध्याकाळी नाट्य त्रिविधा हा कार्यक्रम सुरु होता. अश्विनी या आपल्या सहकलाकार डॉ. रेवा नातू, चिन्मय जोगळेकर, अनुपमा बर्वे-कुलकर्णी यांच्यासमवेत रंगमंचावर नृत्य सादर करत होत्या. नाटकाचा प्रयोग सुरु असताना शेवटच्या प्रसंगाला नृत्य करताना, अश्विनी यांनी गिरकी घेतली. त्याचवेळी त्या रंगमंचावर कोसळल्या.. मात्र उपस्थितांना हा नाटकातीलच भाग असल्याचा समज झाला.  त्यादरम्यानच पडदाही पडला, मात्र अश्विनी जमिनीवर कोसळल्या, त्या कायमच्याच. अश्विनी एकबोटे यांच्या अकस्मात निधनाने सिने-नाट्य क्षेत्रात शोककळा पसरली. वयाच्या केवळ ४४व्या वर्षी त्यांची अकाली एक्झीट रसिकांच्या मनाला चांगलीच हुरहूर लावून गेली.

अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचे निधन, प्रयोग सुरू असताना हृदयविकाराचा झटका