बॉलीवूड अभिनेत्री असिन मंगळवारी ‘मायक्रोमॅक्स’चे सहसंस्थापक राहुल शर्मा यांच्याशी विवाहबद्ध झाली. असिन आणि राहुल यांनी आज सकाळी चर्चमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. त्यानंतर आज संध्याकाळीच हे दोघे हिंदू पद्धतीनेही विवाह करणार आहेत. या दोघांचा जवळचा मित्र अभिनेता अक्षय कुमार या विवाहाला हजेरी लावण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारच्या माध्यमातून असिन आणि राहुल यांची एकमेकांशी ओळख झाली होती. दरम्यान, आज संध्याकाळच्या विवाह विधीसाठी असीन सब्यसाचीने डिझाईन केलेला लेहंगा परिधान करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. याशिवाय, येत्या २३ तारखेला मुंबईत त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.

असीनच्या रिसेप्शनचे पहिले कार्ड अक्षय कुमारला!
६ कोटींची अंगठी देऊन राहुलने केले असिनला प्रपोज!