आज अनेक भारतीय कलाकार हॉलीवूडपटांमध्येही झळकू लागल्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष आता हॉलीवूड सिनेसृष्टीच्या दिशेने वळले आहे. सुरुवातीला फक्त इंग्रजी भाषेतच प्रदर्शित होणारे हे चित्रपट आता हिंदी, तामीळ आणि तेलुगु यांसारख्या भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित होत असल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकवर्गालादेखील आता ते अधिक चांगल्या प्रकारे समजू लागले आहेत. परिणामी आता इथल्या तरुण पिढीत पाश्चात्त्य कलाकार, संगीत, दिग्दर्शक, तंत्रज्ञान याविषयी दिवसेंदिवस आकर्षण वाढत चालले आहे. असाच काहीसा प्रकार आता पाश्चात्त्य देशांमध्येही दिसून येत आहे. इंग्रजी भाषांतर केलेले अनेक भारतीय चित्रपट परदेशांतही प्रदर्शित होत असल्यामुळे तेथील प्रेक्षकांनाही भारतीय चित्रपटांविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. आणि याची प्रचीती अभिनेता ख्रिस हॅम्सवर्थने नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यातून आली. ‘थॉर राग्नारोक’ या त्याच्या अगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात ख्रिसने बॉलीवूड चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी त्याने ‘बाहुबली’ या चित्रपटाची स्तुती करणारे ट्विट केले होते. या संदर्भातील काही प्रश्नांना उत्तरं देत असताना त्याने भारतीय चित्रपटांची दिलखुलास स्तुती केली. भारतीय सिनेसृष्टीतील वैविध्य त्याला आश्चर्यचकित करते. तसेच इथल्या चित्रपटांत तंत्रज्ञानाचा वापर फार कमी प्रमाणात होत असल्यामुळे येथील अभिनेत्यांना आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावावे लागते. त्यामुळे हॉलीवूडच्या तुलनेत येथे अधिक उच्च दर्जाचे कलाकार तयार होतात असे ख्रिस हॅम्सवर्थचे मत आहे. अशा ठिकाणी काम करून त्याला त्याच्या अभिनय कौशल्यात अधिक सुधारणा करण्याची संधी मिळेल असे वाटत असल्यानेच त्याने बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या तो काही भारतीय दिग्दर्शकांच्या संपर्कात असून दर्जेदार पटकथेच्या शोधात आहे.

स्विफ्टचे लाईफ आता अ‍ॅपवर

Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आज चर्चेत राहण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत असतात. काही मंडळी चित्रविचित्र कपडे घालून मिरवतात, काही खळबळजनक विधाने करतात, काहींची आपत्तिजनक छायाचित्रे व व्हिडीओ समाजमाध्यमांतून प्रसिद्ध होतात, तर काहींचे अन्य काही.. जनमानसांत चर्चा होणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. अभिनेत्री टेलर स्विफ्टनेदेखील याच उद्देशाने चक्क एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू करण्याची घोषणा केली आहे. सध्याचे युग हे अद्ययावत तंत्रज्ञानाचे आहे. आजची तरुण पिढी दूरदर्शन व संगणकापेक्षा जास्त स्मार्टफोन्सचा वापर करते. त्यामुळे २४ तास अ‍ॅप्लिकेशनच्या जगात वावरणाऱ्या चाहत्याच्या आणखीन जवळ जाण्यासाठी टेलरने त्याच्याच सोयीचा व आवडीचा मार्ग स्वीकारला आहे. तिच्या अ‍ॅप्सचे नाव ‘द स्विफ्ट लाईफ’ असून त्याचे ट्रेलर सध्या फेसबुक व इन्टाग्रामवर झळकत आहेत. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून तिची जीवनशैली, तिची छायाचित्रे, वैयक्तिक व्हिडीओ, अगामी चित्रपट यांची इत्यंभूत माहिती तिच्या चाहत्यांना मिळेल. शिवाय त्यांना या अ‍ॅप्सच्या माध्यमातून थेट तिच्याशी संपर्कदेखील साधता येईल. शिवाय लाखो नोंदणीदारांमुळे प्रचंड आर्थिक नफा तिला मिळवता येऊ शकतो. या सर्वांचा विचार करून तिने एका नवीन माध्यमात गुंतवणूक केली आहे. आजवर जॅकी चॅन, जॉनी डेप, मेरिल स्ट्रीप, जस्टिन बीबर यांसारख्या अनेक मोठय़ा कलाकारांनी स्वत:च्या वेबसाइट्स तयार करुन चाहत्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला, परंतु टेलर स्विफ्टने त्यांच्या एक पाऊल पुढे जाऊन थेट स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी आपला संपर्क वाढवला आहे.

हार्वेविरोधात आणखी एक खटला

चंदेरी दुनियेत नाव मिळवण्यासाठी असंख्य लोक अहोरात्र मेहनत करत असतात. त्यापैकी काही मोजकेच असतात ज्यांना आपल्या कलागुणांच्या प्रदर्शनाची संधी मिळते. बाकी इतर लोकांना आपल्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागते. पण त्यातही काहीजण असतात जे सहजासहजी हार न मानता वारंवार प्रयत्न करतात. अशा होतकरू लोकांना संधी देण्याची लालुच दाखववून या क्षेत्रातील काहीजण आपला स्वार्थ साधतात. या विकृत प्रवृत्तींनी आजवर सिनेसृष्टीतील अनेक स्त्रियांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. पण त्यांच्यापैकी काहीजणी अशा असतात, ज्या गप्प न बसता आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवतात. ब्रिटिश अभिनेत्री लायसेट अ‍ॅन्थोनी हे त्यातलंच एक नाव. लैगिंक छळ केल्याप्रकरणी लायसेटने अमेरिकन चित्रपट निर्माता हार्वे वेन्स्टाइनविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. १९८०च्या दशकात जेव्हा तिची कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती तेव्हा एका कार्यक्रमादरम्यान ती हार्वेच्या संपर्कात आली. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाची भुरळ तिला पडली आणि क्षणार्धात दोघांमध्ये मैत्री झाली. परिणामी हळूहळू तिचे त्याच्या घरी येणे-जाणे वाढले. त्याच दरम्यान एका रात्री त्याने तिच्यावर लैगिंक जबरदस्ती केली, अशी तक्रार तिने पोलिसांकडे केली आहे. तिच्या मते तिने त्यावेळी पोलीस तक्रार केली होती. परंतु हार्वेने पैशांचा गैरवापर करून तिचा आवाज दाबून टाकला. पण आज वयाच्या ५४व्या वर्षी ती सिनेसृष्टीतील एक यशस्वी अभिनेत्री असून तिच्याकडे आज अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची क्षमता आहे. म्हणून तिने त्या संदर्भात पुन्हा एकदा खटला लढण्याचा निर्णय घेतला आहे. हार्वे वेन्स्टाइनच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते काही लोक पुराव्यांअभावी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे आरोप करत आहेत. ते वेळीच थांबले नाहीत तर त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलली जातील, अशी धमकीही त्यांनी दिली. या संपूर्ण प्रकारात आश्चर्य म्हणजे वेन्स्टाइनविरोधात आजवर लायसेट अ‍ॅन्थोनीसारख्या शेकडो हॉलीवूड अभिनेत्रींनी लैगिंक शोषणाचे आरोप केले आहेत. परंतु पुराव्याअभावी त्या सर्वांचे आवाज दडपले गेले. या पाश्र्वभूमीवर विचार करता हा खटला किती काळ चालेल हे पाहण्याजोगे आहे.