‘टारझनः द वंडर कार’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आएशा टाकियाच्या सौंदऱ्यावर अनेकजण घायाळ होते. पण आता तिने प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. आएशाने याआधीही ब्रेस्ट सर्जरी केली होती. पण आता तिने एकाहून अधिकवेळा प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे आएशाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. तिच्य चेहऱ्यातला बदल काही लपवू शकत नाही.

ती सोशल मीडियावर फास सक्रीय आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसाठी तिचे नवनवीन फोटो सतत पोस्ट करत असते. आधीच्या चेहऱ्यापेक्षा तिचा आताचा चेहरा वेगळा दिसत आहे. तिचे पूर्वीचे फोटो आणि आताचे फोटो यात फार फरक आहे. अनेक प्रकारच्या सर्जरी केल्यामुळे मूळ आएशा आता कुठेच दिसत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

तिचे आताचे फोटो पाहिल्यानंतर तिचे ओठ, भूवया, जबडा, कपाळ यामध्ये फार फरक दिसून येत आहे. त्यातही आता तिचे ओठ आधीपेक्षा जास्त मोठे वाटत आहेत. त्यामुळे ओठांवरची शस्त्रक्रिया फसली असेच म्हणावे लागेल.

aayesha-2

 

aayesha

२००९ मध्ये आएशाने फरहान आझमी याच्याशी विवाह केला होता. फरहान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. लग्नानंतर आएशा सिनेसृष्टीपासून काहीशी दूरच गेली होती. २०१३ मध्ये तिने मुलाला जन्म दिला होता. मुलाचे नाव मिकाइल असे ठेवले होते.
२००४ मध्ये ‘टारझन द वंडर कार’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आएशाने शाहिद कपूरबरोबर ‘दिल मांगे मोर’, अभय देओल बरोबर ‘सोचा ना था’ हे सिनेमे केले. २००९ मध्ये सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या सिनेमातही ती दिसली होती. तिचा आतापर्यंतचा शेवटचा सिनेमा ‘आप के लिए हम’ २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता.