दिग्दर्शक मिलन लुथारियाचा आगामी ‘बादशाहो’ सिनेमात अजय देवगण आणि इलियाना डिक्रूझ रोमान्स करताना दिसणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दोघांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळते. पण त्यांच्या या केमिस्ट्रीतील काही भागाला कात्री लागली आहे. सिनेमातील त्या दोघांच्या एका लव्ह मेकिंग दृश्याला कात्री लावली आहे. या दृश्यामुळे सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकू शकतो अशी भिती दिग्दर्शकाला होती. म्हणून पुढे काही घडण्यापेक्षा त्यांनी आधीच ते दृश्य काढण्याचा निर्णय घेतला.

कोणी आपले फोटो काढत असेल तर काय करावे, शाहरुखची सुहानाला हटके टिप्स

सिनेमात अजय आणि इलियाना यांचे लव्ह मेकिंगचे एक १० मिनिटांचे दृश्य आहे. हे दृश्य सिनेमाच्या कथानकानुसार जरी आवश्यक होतं. पण मिलन लुथारिया यांनी हा १० मिनिटांचे दृश्य कमी करण्याचा निर्णय घेतला. यातला मोठा किसिंग सीनचा भाग कमी करण्यात आला. दिग्दर्शकाला आता कोणत्याही सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकायचे नाही. मिलन यांना सिनेमासाठी यू/ए प्रमाणापत्र हवे आहे. पण जर तो लव्ह मेकिंग सीन ठेवला असता तर मात्र सिनेमाला कदाचीत ए प्रमाणपत्र मिळाल असते. अजून हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाडे गेलेला नाही.

सेन्सॉरची सध्याची परिस्थिती पाहता त्यांना या सिनेमात अजून काही तरी चुका दिसू शकतील आणि ते त्याच्यावर बोट ठेवून ए प्रमाणपत्र देऊ शकतात. सिनेमात अजय आणि इलियानाशिवाय इम्रान हाश्मी, ईशा गुप्ता आणि विद्युत जामवालही आहेत. बादशाहोमध्ये सनी लियोनीचे एक खास गाणे असणार आहे.

जाणून घ्या, कोणत्या देशात किती आहेत बच्चन कुटुंबियांचे बंगले

अजयच्या या सिनेमाची कथा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीच्या काळातील आहे. आतापर्यंत या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आतापर्यंत तीन वेळा बदलण्यात आली आहे. सुरूवातीला हा सिनेमा २६ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण नंतर ती तारीख पुढे ढकलून १२ मे करण्यात आली. पण आता हा सिनेमा १ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.