‘बाहुबली: द कन्क्लूजन’ या सिनेमात अभिनय केलेला अभिनेता पी. सुब्बाराजू याचे ड्रग्ज रॅकेट प्रकरणात नाव समोर आले आहे. शुक्रवारी विशेष तपास पथकासमोर सुब्बाराजूला हजर करण्यात आले होते. बाहुबली २ या सिनेमात सुब्बाराजूने कुमार वर्माची व्यक्तिरेखा साकारली होती. एक्साइज अॅण्ड प्रोहीबिशन डिपार्टमेंटच्या विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) पी. सुब्बाराजू हजर झाला होता. यावेळी त्याची ड्रग्ज रॅकेटसंदर्भात कसून चौकशी करण्यात आली.

जाणून घ्या, कोणत्या देशात किती आहेत बच्चन कुटुंबियांचे बंगले

aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

तसेच तेलगू सिनेसृष्टीशी निगडीत अजून १२ जणांना एसआयटीने समन्स पाठवले आहेत. १९ जुलैला दिग्दर्शक जग्धाधही एसआयटीसमोर हजर राहिले होते. जग्धाध यांची सुमारे १० तास चौकशी करण्यात आली होती. २० जुलैला प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर श्याम के नायडू यांचीही जवळपास ६ तास कसून चौकशी करण्यात आली होती.

काही आठवड्यांपूर्वी हैदराबादमध्ये एलएसडी आणि एमडीएमएसारखे अमली पदार्थ सापडले होते. या प्रकरणात पोलिसांनी १५ अमली पदार्थ तस्करांना अटक केली. या आरोपींकडे पोलिसांना तीन सिमकार्ड सापडली. सध्या ही सीमकार्ड पोलिसांनी जप्त केली आहेत. या सिमकार्डमध्ये जवळपास १५०० हून अधिक फोन नंबर आहेत. या तस्करांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेल्या नंबरपैकी अधिकतर नंबर हे सिनेसृष्टीशी निगडीत असलेल्या व्यक्तींचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील २५ लोकांचे संपर्क आणि कॉल रेकॉर्ड सापडले.

कोणी आपले फोटो काढत असेल तर काय करावे, शाहरुखची सुहानाला हटके टिप्स

इतकेच नाही तर यांचे संभाषण हे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये शिवा, जेन आणि सनशाइन असे सांकेतिक शब्दांचा ते वापर करायचे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी या लोकांना एलएसडीसारख्या अमली पदार्थांचा पुरवठा करायचे. ४ जुलै रोजी पोलिसांनी या टीमवरुन पडदा उठवला. सध्या पुरी जग्नाध याच्या हाताचे, नखांचे आणि केसांचे नमुने फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.