दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याची माहिती

बाप आणि मुलगा यांचे नाते हा गंभीर विषय ‘बापजन्म’ चित्रपटामध्ये रंजकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी या चित्रपटाचे चांगले स्वागत केले आहे. आता जगभरातील मराठी लोकांपर्यंत ‘बापजन्म’ चित्रपट पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे या चित्रपटाचा सहनिर्माता, पटकथालेखक आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने सोमवारी सांगितले.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

आशय फिल्म क्लब आणि आशय सांस्कृतिकतर्फे नव्याने प्रदर्शित झालेला ‘बापजन्म’ चित्रपट दाखविण्यात आला. त्यानंतर झालेल्या चर्चेत निपुणसह संगीतकार गंधार संगोराम, अभिनेता पुष्कराज चिरपुटकर आणि ‘१४ बाय ६४ इव्हेंट मॅनेजमेंट’चे सत्यजित यांनी सहभाग घेतला. सुप्रिया चित्राव यांनी सर्वाशी संवाद साधला.

‘बापजन्म’ प्रदर्शित झाला त्या आठवडय़ात सात मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. आता पुण्यामध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. अनेक जण चित्रपट पाहून फेसबुक, ट्विटरवर लिहीत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील मराठी लोकांपर्यंत चित्रपट पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अबुधाबी या देशांतील महाराष्ट्र मंडळांशी संपर्क साधण्यात आला आहे. स्वीडनमध्ये ‘बापजन्म’ चित्रपटाचा खेळ होणार असल्याचे निपुणने सांगितले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मुळे स्टार झालेल्या पुष्कराज याला नोकराची भूमिका करशील का, असे मी घाबरतच विचारले. चित्रपट बाप-मुलाच्या नात्याचा असला, तरी माउली व्यक्तिरेखेचे पुष्कराजने सोने केले आहे, अशी टिप्पणी निपुणने केली.

‘बापजन्म’ नावाचे नाटक मी पूर्वी केले होते. या चित्रपटाचा विषय पाच वर्षांपासून मनात घोळत होता. चित्रपटाची सूत्रे हाती घेण्यासाठी लेखन ते दिग्दर्शन अशा सर्व जबाबदाऱ्या पेलल्या पाहिजेत म्हणूनच पटकथालेखन केले. व्यक्तिरेखांवर विशेष काम केल्यामुळे प्रसंग आपोआप घडत गेले. सध्याचे वास्तव इतके विचित्र झाले आहे, की आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतात. मात्र, हा गंभीर विषय रंजकपणे मांडण्याचा सुवर्णमध्य गाठता आला, असेही निपुणने सांगितले.

निपुण आणि मी बारा वर्षांपासून एकत्र असल्याने त्याला काय हवे हे मला न सांगता देखील समजते. या चित्रपटातील गीतांसाठी वसंतरावांची नात दीप्ती माटे आणि जयदीप वैद्य यांचा आवाज वापरण्यात आला आहे. घडय़ाळाच्या टकटक आवाजाप्रमाणे गिटारचा पीस हा चित्रपटभर पाश्र्वसंगीत म्हणून जाणीवपूर्वक वापरला असल्याचे गंधार संगोरामने सांगितले.

निपुणकडेच मी ‘स्ट्रगल’ केला असल्याने तो चित्रपट करतोय म्हटल्यावर मी काम करणार हे उघड होते. उत्तम लिहिलेली भूमिका महत्त्वाची, मग ती नोकराची का असेना. आधीची पाटी कोरी करून ही नवी भूमिका साकारली. कितीही स्टार असला तरी गडी काय असतो हे निपुणने दाखवून दिले आहे, असे पुष्कराजने सांगितले. माउली व्यक्तिरेखा साकारताना सातारा-सांगली भागातील ग्रामीण बोलीचा लहेजा जाणीवपूर्वक वापरला, असेही त्याने सांगितले.