अभिनेता रणवीर सिंग विविध पुरस्कार सोहळे किंना इतर कार्यक्रमांना हजेरी लावतो त्यावेळी त्याचा उत्साह पाहण्याजोगा असतो. सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये रणवीरचे नाव घेतले जाते. त्याचा मनमिळाऊ स्वभाव आणि धम्माल करण्याची सवय नेहमीच त्याला प्रसिद्धी देते. आजवर विविध चित्रपटांच्या माध्यमातूनही रणवीरने त्याच्या अभिनयाचा चांगलाच नमुना सादर केला आहे. नुकत्याच आज तक या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये रणवीरने हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांनीही हजेरी लावली होती. पण, आमंत्रितांच्या गर्दीमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधले ते म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि योगगुरु रामदेव बाबा यांच्या नृत्याने.

रणवीर नेहमीच कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेला की त्याला एकदातरी उपस्थितांकडून त्याच्या हटके अंदाजात नाचण्याचा आग्रह केला जातो. पण या कार्यक्रमात मात्र रणवीर स्वत: योगगुरु रामदेव बाबांनाच नाचण्यासाठी आग्रह करत होता. रणवीच्या या आग्रहाला थट्टा समजत काही क्षणांसाठी बाबाजींनी त्याच्यासमोर हसत-हसत हात जोडले खरे. पण, काही केल्या न ऐकणाऱ्या रणवीरने शेवटी रामदेव बाबांना नाचण्यासाठी व्यासपीठावर नेलेच. रणवीर आणि रामदेव बाबा व्यासपीठावर पोहोचताच या दोघांनीही मोठ्या उत्साहामध्ये ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटातील ‘मल्हारी’ या उडत्या चालीच्या गाण्यावर नाचायला सुरुवात केली. रामदेव बाबांनी त्यांच्या योगासनांच्या काही आसनांच्या मदतीने गाण्याचा ठेका धरत मोठ्या उत्साहात थिरकायला सुरुवात केली. त्यानंतर राबदेव बाबांचा उत्साह आणि त्यांच्या नाचण्याच्या वेगासोबत मेळ साधण्यामध्ये रणवीरही चांगलाच दमला हे पाहायला मिळत आहे. त्यामुळे योगगुरु रामदेव बाबा आणि रणवीरचा हा पॉवरपॅक डान्स परफॉर्मन्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
beed district loksabha marathinews, dhananjay munde marathi news
मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा बैठकांवर जोर, मराठा भवन बांधून देण्याचे आश्वासन
arrest
रंग लावण्यासाठी अल्पवयीन मुलीला घरातून खेचून आणले; विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत आरोपीला अटक
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

दरम्यान, अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी ‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि अभिनेत्री वाणी कपूर महत्त्वाच्या भूमिकेमध्ये झळकणार आहेत. वाणी कपूर या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तर आदित्य चोप्रासुद्धा ‘बेफिक्रे’च्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत असेच म्हणावे लागेल.