बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका तिच्या आगामी ‘बेवॉच’ या पहिल्यावहिल्या हॉलिवूड चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. दरम्यान तिला मोकळ्या आणि लांब केसांनी त्रास सहन करावा लागत आहे. लांब केसांचा मला त्रास होत आहे, असे प्रियांकाने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. मोकळे आणि लांब केस अनेकदा अधिक मोकळे वाटत असल्यामुळे मला केस वाढवल्याचा पश्चाताप होत असल्याचे ती म्हणाली. एकेकाळी मी केस वाढविण्यावर अधिक मेहनत घेत होते. मात्र, सध्याच्या घडीला मला ही स्टाईल नकोशी झाली आहे, असे तिने सांगितले. तसेच बारीक केसांमुळेही सौंदर्य अधिक खुलून दिसते, असा सल्लाही तिने महिलावर्गाला दिला.

प्रियांका हॉलिवूड पदार्पणासोबतच फॅन्सी ड्रेसमुळेही चांगलीच चर्चेत असते. ड्रेसबद्दल ती म्हणाली की, यावर्षी मेट गाला आणि मागील वर्षी ‘एमी’ पुरस्कार सोहळ्यात घातलेला लाल रंगाचा ड्रेस आतापर्यंतचा माझा सर्वोकृष्ट पोशाख होता. प्रियांका आणि विविध कार्यक्रमांच्या रेड कार्पेटवरील तिचा वावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. ‘ऑस्कर’ आणि ‘एमी’ पुरस्कार सोहळ्यांच्या रेड कार्पेटवर तिने अनेकांना घायाळ केले होते. यावेळी ‘राल्फ लॉरेनच्या’ ट्रेन्च कोट गाऊनमुळे प्रियांका चांगलीच चर्चेत आली होती. सोशल मीडियावरही प्रियांकाच्या या लांबलचक गाऊनचीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. बऱ्याचजणांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रियांकाचे फोटो पोस्ट करत तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

प्रियांका चोप्रा कट्टर भारतीय, प्रश्नोत्तरावेळी दिलेली उत्तरं तर पाहा…