‘लास्ट टँगो इन पॅरिस’ या चित्रपटातील अभिनेत्री मारिया शिनाइटर हिच्या परनावगीशिवायच, ती अनभिज्ञ असताना चित्रपटातील बलात्काराच्या दृश्याचे चित्रीकरण केले होते असा खुलासा बर्नाडो यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बर्तोलुची यांनी या दृश्याबद्दल त्या अभिनेत्रीला काहीही कल्पना दिली नव्हती. त्या अभिनेत्रीला हे सुद्धा ठाऊक नव्हते की तिला मार्लोन ब्रॅण्डोसोबत बलात्काराच्या दृश्याचे चित्रीकरण करायचे होते. यावरील चर्चा संपत नाही तोवर याच्याशी निगडीत अजून एक गोष्ट समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री रेखाबाबतीतही असेच काही घडले होते. यासीर उस्मान यांनी रेखाच्या आत्मचरित्रात असाच एक किस्सा लिहिला होता.

यासीर उस्मान यांनी लिहिलेल्या रेखांच्या या आत्मचरित्रात रेखांनी अशाच धाटणीचा एक प्रसंग सांगितला आहे. जेव्हा रेखा १५ वर्षांच्या होत्या त्यांच्यासोबत असाच एक प्रसंग घडला होता. तेव्हा त्यांनी काहीही न करता फक्त त्या प्रसंगातून स्वतःला वाचवण्यासाठी डोळे बंद करुन घेतले होते.

रेखा यांचा अंजाना सफर हा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमात त्यांना बिस्वजीत या अभिनेत्याने जबरदस्तीने चुंबन केले होते. हे चुंबन सुमारे ५ मिनिटांचे होते. यावेळी दिग्दर्शकाने कॅमेरा सुरुच ठेवला होता आणि आजूबाजूचे लोक टाळ्या आणि शिट्या मारत होते.

हा प्रकार लास्ट टँगो चार्ली या सिनेमातल्या अभिनेत्रीसोबत झालेल्या प्रसंगाशी मिळता जुळता आहे. १९ वर्षीय मारिया शिनाइटर हिच्या परनावगीशिवायच, ती अनभिज्ञ असताना सिनेमातील बलात्काराच्या दृश्याचे चित्रीकरण, सिनेमाचे दिग्दर्शक बर्नाडो यांनी केले होते.
पण अशा घटनांबद्दल तेव्हा कोणीच कसे बोलले नाही असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. याशिवाय स्वतःचे करिअर वाचवण्यासाठी अशा परिस्थितींना सामोरे जावेच लागायचे असे म्हटले जाते. स्वतः अभिनेत्रीही याबाबतीत तेव्हा काहाच बोलायच्या नाहीत.

छाया सौजन्यः मिस मालिनी
छाया सौजन्यः मिस मालिनी

क्रिस इवन्स, जेसिका चॅसटेन यांसारख्या हॉलिवूडच्या नावाजलेल्या कलाकारांनी या गोष्टीचा विरोध केला आहे. अशा गोष्टी कोणी कसं करु शकतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.