ऑस्कर पुरस्कार सोहळा नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडला. यंदाच्या ८९ व्या पुरस्कार सोहळ्यामध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स विभागात नामांकन मिळालेले सर्वच चित्रपट उत्तम होते. त्यामुळे या विभागात नक्की कोणता चित्रपट बाजी मारणार याबाबत प्रत्येकाला उत्सुकता होती. अखेर नामांकन मिळालेल्या सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स विभागातून डिस्नेच्या ‘द जंगल बुक’ चित्रपटाने बाजी मारली. ‘डॉक्टर स्ट्रेंज’ सारख्या तगड्या चित्रपटांवर मात करत या चित्रपटाने बाजी मारली होती. मोगलीच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्याचे याआधीच पाहायला मिळाले होते. जगभरात या चित्रपटाने १०० कोटींच्या जवळपास कमाई केली होती. या नव्या जंगल बुकमध्ये मूळचा भारतीय वंशाचा पण अमेरिकेत स्थायिक असलेल्या नीलने मोगलीची भूमिका साकारली होती.

या चित्रपटात नील शिवाय दाखवण्यात आलेली अन्य चित्ररंजकता ही कॉम्प्युटरच्या माध्यमातून तयार करण्यात आली होती. चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये बंगळुरुमधील ‘मुव्हिंग पिक्चर कंपनी’चे योगदान महत्वपूर्ण असे आहे. एमपीसी स्टुडिओतील कार्यरत असणाऱ्या तब्बल ३०० डिझायनर्स या चित्रपटासाठी मेहनत घेतली होती. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये हे ३०० डिझायनर्स आणि लंडनच्या काही डिझायर्सनी काम केले होते. एमपीएस स्टुडिओचे दिग्दर्शक ब्रेन घोष यांनी एका मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मितीसाठी दिवसांतून तब्बल १८ तास हे डिझायनर्स घाम गाळत होते. प्रत्येक सेकंदाला २२ फ्रेमचे स्टॅडर्ड डेफिनेशन आणि त्याहुन दुप्पट ३ फ्रेम बनवावे लागत होते. प्राण्यांना वास्तवादी पद्धतीने सादर करण्यासाठी ७० ते ८० प्रकारच्या वेगवेगळ्या फ्रेम आणि १०० हून अधिक प्राण्यांची फ्रेम तयार करावी लागत होती.

‘द जंगल बुक’ हा सिनेमा १५ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित होणार आहे. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून सादर झालेल्या ‘मोगली’ मालिकेतील ‘जंगल जंगल बात चली है पता चला है चड्डी पहेनके फूल खिला है फूल खिला है’ हे गाणे/शीर्षक गीत लहान मुले आणि मोठय़ांमध्येही खूप लोकप्रिय झाले होते. जंगलामध्ये प्राण्यांबरोबर राहणारा हा ‘मोगली’ मुलांचा ‘हिरो’ झाला होता. प्रख्यात निर्माते व दिग्दर्शक बेन किंग्जले यांनी मोगलीचा जीवलग मित्र ‘बगिरा’या पात्राला आवाज दिला होता. ‘बल्लु’ या अस्वलाच्या पात्राला बिल मरे यांनी तर इद्रिस अल्वा, स्कार्लेट जॉन्सन, क्रिस्तोफर वॉकेन यांनी अन्य पात्रांना आवाज दिला आहे.  मूळ इंग्रजीत असलेला हा चित्रपट भारतात हिंदी भाषेत डब होऊन प्रदर्शित करण्यात आला होता.