‘द कपिल शर्मा शो’सोबत भारती सिंगचे नाव जोडले गेल्यानंतर अनेकांना हा शो पुन्हा एकदा उभारी घेईल असे वाटले होते. भारतीच्या येण्याने कपिल शर्मा आणि वाहिनी दोघांनाही थोडा दिलासा मिळाला होता. तिच्या येण्याने हा शो टीआरपीमध्ये वरही आला होता. पण आता लवकरच भारती हा शो सोडणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारती ‘कपिल शर्मा शो’मध्ये येण्यापूर्वी ती ‘कॉमेडी दंगल’ या शोसोबत करारबद्ध झाली होती. भारतीने याबाबत कपिलला पूर्व कल्पनाही दिली होती. आता ‘कॉमेडी दंगल’ हा शो ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होत आहे, त्यामुळे ‘द कपिल शर्मा शो’च्या पुढील दोन भागांमध्येच ती प्रेक्षकांना दिसेल.

‘स्पेशल फ्रेण्ड’सोबत विमानतळावर दिसली श्रुती हसन

याबद्दल बोलताना भारतीने सांगितले की, ‘मी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये तोवर काम करत राहिन जोवर माझा दुसरा शो ‘कॉमेडी दंगल’ ऑन एअर येत नाही. ‘द कपिल शर्मा शो’शी करार करण्यापूर्वीच मी ‘कॉमेडी दंगल’ या शोसोबत करार केला होता. तसे मी कपिलला आधी सांगितले होते. त्यामुळे ‘कॉमेडी दंगल’साठी मी हा शो सोडला असे कोणाला वाटू नये. आम्ही येत्या काळात शाहरुखसोबत ‘जब हॅरी मेट सेजल’च्या टीमसोबत चित्रीकरण करत आहोत.’

अक्षरा हसनने बौद्ध धर्म स्वीकारला? कमल हसनने ट्विटरवर विचारला प्रश्न

टिव्हीच्या या प्रसिद्ध कॉमेडियनने तिच्या आणि किकू शारदाच्या नातेसंबंधांवरही भाष्य केले. त्या दोघांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे तिने स्पष्ट केले. भारती म्हणाली की, ‘अशा पद्धतीच्या अफवा कुठून येतात माहित नाही. मी आणि किकू याबद्दल बोलतही होतो. मी आणि किकूची पत्नी आम्ही फार चांगल्या मैत्रिणी आहोत आणि आम्ही एकमेकींना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो.’ भारतीसोबत ‘कॉमेडी दंगल’मध्ये अनु मलिक, टिव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि देबिना बॅनर्जीही दिसतील.