सध्या बिग बॉस तेलगू फार चर्चेत आहे. दाक्षिणात्य भागातील फार कमीच शोंची इतकी चर्चा केली जाते. या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सुप्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एनटीआरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, शोमधील स्पर्धकही सध्या बरेच चर्चेत आहेत. या स्पर्धकांमधीलच एक नाव म्हणजे मुमैथ खान.

बिग बॉस तेलगू आता सुरु झालं असून, मुमैथ बिग बॉसच्या घरात राहतेय. पण, ती अमली पदार्थांच्या केसमध्ये अडकल्यामुळे तिला आता शो सोडून हैद्राबादला यावे लागणार आहे. तेथे तिची चौकशी केली जाईल. अबकारी आणि प्रतिबंध विभागाने excise and prohibition department तिला समन्स पाठवला आहे. मुमैथ व्यतिरीक्त अभिनेत्री चार्मी कौर, रवी तेजा, नवदीप, तरुण, सुब्बुराज, नंदू आणि आर्ट डायरेक्टर चिन्ना यांनाही समन्स पाठवण्यात आला आहे.

वाचा : ‘तिरंगा उलटा पकडणाऱ्या अक्षय कुमारवर पंतप्रधान कारवाई करणार का?’

मुमैथ ही एक अभिनेत्री असण्यासोबतच आयटम गर्ल म्हणूनही प्रसिद्ध आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ती खूप प्रसिद्ध आहे. तिने जवळपास १५ हिंदी, तेलगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलेय. तसेच तिने सलमान खानसोबत ‘लकी’ आणि संजय दत्तसोबत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील ‘देख ले’ या आयटम साँगमध्ये काम केले होते. तिने जवळपास १०० पेक्षा अधिक हिट आयटम साँग दिले आहेत. मुमैथचा जन्म मुंबईत झालेला. मात्र, तिचे कुटुंब मुळचे पाकिस्तानमधील आहे. मुमैथ मिळून चार बहिणी असून, तिची मोठी बहिण जॉबिन हीसुद्धी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे.

वाचा : ‘सिने’नॉलेज : अशोक सराफ यांचा पहिला चित्रपट कोणता?

मुमैथने जेव्हा तिच्या करियरला सुरुवात केली तेव्हा तिला एका गाण्यासाठी केवळ ७५० रुपये मिळायचे. पण, त्यानंतर ती इतकी प्रसिद्ध झाली की, तिने तिचे मानधन तब्बल ३० लाख रुपये इतके केले. आता ती पाच मिनिटांच्या एका गाण्यासाठी ३० लाख रुपये घेते. हॉलिवूड गायिका शकिरा आणि बेयॉन्स यांच्यापासून ती बरीच प्रभावित असून, त्यांच्यासारखं तिलाही सुपरस्टार बनण्याची इच्छा आहे. ‘काँटे’ चित्रपटातील ‘इश्क समंदर’ या गाण्याने मुमैथने कारकिर्दीला सुरुवात केलेली. तिचे ‘आ रे प्रीतम प्यारे’ हे गाणे खूप प्रसिद्ध आहे.