dilip-thakur‘चला हवा येऊ द्या’मध्ये आमिर खान येणार आहे ही गोष्ट एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच. पण त्यात आमिर फक्त मनोरंजन करण्याच्याच हेतूने आलेला नाही असे त्यानेच याच्या चित्रीकरणाच्या वेळेस स्पष्ट केले व तेच जास्त महत्त्वाचे आहे. आपल्या पाणी फाऊंडेशनचे कार्य व महत्त्व महाराष्ट्रातील अगदी खेड्यापाड्यात दूरवर पोहचावे यासाठीच त्याने हा मार्ग अवलंबिला. मनोरंजनातून सामाजिक प्रबोधन असाच आपला हेतू असल्याचे यावेळेस आमिर आम्हा पत्रकाराना म्हणाला. भविष्यात पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, तेव्हा आताच त्याचा जपून वापर व्हावा व ग्रामीण भागात त्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, उपलब्ध मार्गात अधिक चांगले काही करण्याचा प्रयत्न करावा, असाच यामागचा हेतू आहे. आमिरच्या या सामाजिक बांधिलकीला दाद द्यावी तेवढी थोडीच! खरंतर पूर्वीच्या तुलनेत आजच्या काळातील बरेचसे कलाकार आपलीच कारकीर्द, आपले यश व आपले ग्लॅमर या त्रिवेणी संगमापुरताच फोकस ठेवत नाहीत. त्यापलीकडे जाऊन आपली सामाजिक सांस्कृतिक बांधिलकी आहे. आपण आपल्या लोकप्रियतेचा समाजाला काही फायदा करून देऊ शकतो, असा खूप वेगळाच व सकारात्मक विचार करताहेत व त्यातून त्यांची समंजस माणूस म्हणून चांगली ओळख होतेय असे दिसतंय. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ या संस्थेबाबतही आपल्याला तेच पाहायला मिळाले. ‘नाम’च्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला समाजाच्या विविध स्तरातून प्रतिसाद मिळाला हे विशेषच. नाना पाटेकर व मकरंद ग्रामीण भागात दूरवर पोहोचले व त्यानी शेतकऱ्यांची सुख दु:खे जाणून घेतली. त्यात अर्थातच दु:ख तणाव वेदना विवंचना याचेच प्रमाण जास्त होते. अक्षय कुमारदेखील शक्य असेल त्या प्रमाणात सामाजिक सेवेसाठी आर्थिक मदत करतोय. इतरही काही लहान मोठ्या कलाकारांकडून अशा अथवा अन्य पद्धतीने सामाजिक मदत होत आहे. चित्रपटसृष्टीतील हा एक खूप मोठाच व स्वागतार्ह बदल म्हणता येईल.

फार पूर्वीपासूनच चित्रपटसृष्टीकडून समाजाला मदत होत आहे. पण त्याचे स्वरूप भिन्न होते. अनेकदा तरी मध्य व दक्षिण मुंबईतील रस्त्यावर उघड्या ट्रकमधून हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार मदत फेरी काढत व त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याच्या आनंदात जनसामान्य पैसे, वस्तू अथवा कपडे या स्वरूपात मदत करत. सत्तरच्या दशकातील अशा दोन मदत फेरीत उडालेला गोंधळात गोंधळ आठवतोय.  त्यात मदत मागणे व करणे यात फारसे गांभीर्य जाणवत नसे. कलाकार पाहा पैसे द्या असाच काहीसा म्हटलं तर आचरट प्रकार असे. संपूर्ण दिवसभर मुंबई विस्कळीत होई. त्यापेक्षा या कलाकारांनी एक दिवसाचे आपले उत्पन्न दिले तरी ते जास्त होईल असे म्हटले गेले. हिंदीवाले अशी मदत फेरी काढण्यात धन्यता मानतात म्हणून लालबाग माझगाव परिसरात मराठी कलाकारही अशीच फेरी मारून मदत गोळा करत. बंगालमधील दुष्काळग्रस्तांसाठी हिंदीची तर महाराष्ट्रातील गावांसाठी मराठीची फेरी होती. त्या तुलनेत नाना पाटेकर अथवा आमिर यांचे सामाजिक धोरण खूप सकारात्मक आहे. आपला स्टारडम विसरून प्रत्यक्ष ग्रामीण भागात दूरवर जाऊन जनतेशी संवाद साधत त्यांना समजावून घेणे अधिकच कौतुकास्पद आहे. हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अधिकाधिक कलाकार भविष्यात अशा पद्धतीनेच सामाजिक सेवेसाठी वेळ देतील उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहेच. आमिरच्या पाणी फाऊंडेशनमध्ये सई ताम्हणकर इत्यादीं कलाकार आहेत. स्टार म्हणजे फक्त यशासह ग्लॅमर, गॉसिप्स, मोठे घर, नवीन मॉडेलची गाडी, फॅशनेबल वस्त्रे इतकेच नव्हे तर त्यापलीकडे जाऊनही बरेच काही आहे, अशी चित्रपटसृष्टीत भावना वाढीला लागलीये वा लागेल असेच चिन्ह दिसत आहे. तरीही काही अपवाद राहिलेच तर त्याबाबत कोणीच काही करु शकत नाहीत. आपण तूर्त आमिर, नाना, मकरंद, अक्षय कुमार अशांनी एक वेगळीच वाट धरली आहे व आपली पडद्यावरची वाटचाल सांभाळत त्यावर चाललेत. प्रसंगी त्यात आपली लोकप्रियता व प्रतिमेचा लाभ देत आहेत, त्याचे विशेष कौतुक करूयात.
दिलीप ठाकूर

Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद