अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची अनेकांचीच इच्छा असते. पण, चित्रपटात अमिताभ बच्चन साकारात असलेल्या व्यक्तिरेखेची लहानपणीची भूमिका रुपेरी पडद्यावर वठविण्याची संधी मिळाली तर, ही संधी मिळाली होती एका बालकलाकाराला. अमिताभ बच्चन यांच्या अनेक जुन्या चित्रपटांमधील या बालकलाकाराचा चेहरा अनेकांच्या ओळखीचा आहे. या कलाकाराचं नाव आहे मयूर राज वर्मा. त्याकाळी तो ‘मास्टर मयूर’ नावाने प्रसिध्द होता. सध्याच्या घडीला तो चित्रपटांमधून फारसा दिसत नसला तरीही त्याचा उल्लेख मात्र आवर्जून केला जातो.

मयुर सध्या व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असून, या क्षेत्रात त्याचा पक्का जम बसला आहे. स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी मयूरने जवळपास १५ चित्रपट आणि ९ मालिकांमध्ये काम केलं. एक काळ असा होता की बॉलिवूडमध्ये काही प्रसिद्ध बालकलाकारांमध्ये त्याचं नाव घेतलं जायचं. ७०-८० च्या दशकात त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये बिग बींचं बालपण साकारलं होतं. शरीरयष्ठी, चेहरेपट्टी अमिताभ यांच्यासारखीच असल्यामुळे त्यांना ‘यंग अमिताभ बच्चन’ म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं होतं. मयूरच्या नावाला खऱ्या अर्थाने ओळख दिली ती ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटाने. या चित्रपटातील त्याची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर त्याला इतर चित्रपटांच्या ऑफर आल्या. किंबहुना त्या काळात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बालकलाकारांमध्ये मयूरचा समावेश होता.

Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

चित्रपटात अमिताभ बच्चन साकारत असलेली व्यक्तिरेखा बालकलाकाराच्या रुपात लिलया पेलणारा मयूर प्रसिद्धीझोतात असतानाच एकाएकी चित्रपटसृष्टीपासून दुरावला गेला. एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सध्या तो वेल्समध्ये स्थायिक झाला असून ‘इंडियाना’ नावाचं एक हॉटेल चालवतो. यामध्ये त्याला पत्नीची साथ लाभली आहे. त्याशिवाय बॉलिवूड चित्रपटांची ओळख टिकून रहावी यासाठी तो वेळोवेळी विविध कार्यशाळांचंही आयोजन करत असतो. ‘वेल्स अनलिमिटेड’ नावाची एक कंपनी सुरु करण्यामध्येही मयूरचा सहभाग आहे. त्याची एकंदर परिस्थिती पाहता रुपेरी पडद्यावर नाही. पण, पडद्याआड राहून मयूर चित्रपटसृष्टीला अनुभवतोय असंच म्हणावं लागेल.