दिवाळीच्या उत्साह आता ओसरला असला तरीही भेटवस्तू देण्याघेण्याचे सत्र अद्यापही सुरुच आहे. दिवाळीच्या निमित्ताने भेटवस्तू खरेदी करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. सहसा या भेटवस्तू आपल्या आप्तेष्ठांना दिल्या जातात. पण, अभिनेता रंगनाथन माधवन म्हणजेच सर्वांचा लाडका आर माधवन याने मात्र स्वत:लाच एक सुरेख दिवाळी भेट देऊ केली आहे. मोठमोठ्या ब्रॅण्डच्या बाईकप्रती असणारे त्याचे प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. याच प्रेमापोटी त्याने आणखी एक बाईक खरेदी केली असून, सध्या सोशल मीडियावर त्याच्या या बाईकची जबरदस्त चर्चा सुरु आहे.

माधवनच्या बाईकविषयीच्या चर्चा रंगण्याचे मुख्य कारण आहे, त्या बाईकची किंमत. ‘लक्झरी क्रूझर इंडियन रोडमास्टर’ ही बाईक त्याने खरेदी केली असून त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. माधवनच्या या बाईकची किंमत ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत. कारण, एक दोन नव्हे तर तब्बल ४०.४५ लाखांना त्याने ही अप्रतिम बाईक खरेदी केली आहे. आधीपासून त्याच्याकडे ‘बीएमडब्ल्यू के१६०० जीटीएल’ (BMW K1600 GTL), ‘डुकाटी डायवेल’ (Ducati Diavel) आणि ‘यामाहा व्ही- मॅक्स’ (Yamaha V-Max) या एकाहून एक सरस बाईक्स आहेत.

https://www.instagram.com/p/BaibNBFj2b_/

https://www.instagram.com/p/BaY-lBrj5V1/

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

‘क्रूझर मोटरसायकल्स’मध्ये ‘रोडमास्टर’ हा एक प्रिमियम ब्रॅण्ड आहे. खास व्हिंटेज स्टाईल लूक या बाईककडे वारंवार मागे वळून पाहण्यास भाग पाडतो. या बाईकचा फोटो माधवनने त्याचा इन्सटाग्रामवरुन पोस्ट केल्यानंतर बाईकवेड्या मंडळींनी रोडमास्टरसंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली. या बाईकमध्ये १८११ सीसी थंडरस्ट्रोक १११, व्ही- ट्वीन इंजिनची सोय असून, बाईकला स्मार्टफोन जोडण्याचीही सोय आहे. ज्याशिवाय ब्लूटूथ, यूएसबी कनेक्टीव्हिटी, एलईडी लाईट्स, क्रूझ कंट्रोल, रिमोट लॉकिंग अशा अत्याधुनिक सुविधाही यामध्ये देण्यात आल्या आहेत. या बाईकचा लूकही फार लक्षवेधी आहे. मुख्य म्हणजे आपल्याही संग्रही ही बाईक असावी असं वाटणाऱ्यांसाठी माधवनची ‘रोडमास्टर’ चर्चेचा विषय ठरत आहे.