संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर या चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटासाठी सर्वच कलाकारांनी बरीच मेहनत घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता रणवीर सिंगला दुखापतीला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात जाण्याची वेळ आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शाहिद आणि रणवीर यांच्यातील लढाईच्या दृश्याचं चित्रीकरण सुरू असताना तलवार रणवीरच्या हातावर लागली. त्यामुळे त्याच्या हातातून रक्तस्त्राव होऊ लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परफेक्शनकडे जास्त लक्ष देत रणवीर आणि शाहिद त्या दृश्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी रणवीरच्या हातावर नकळत तलवारीचा हलकासा फटका बसला. त्यानंतर रणवीरने लगेचच उपचारासाठी रूग्णालयात धाव घेतली.

भन्साळींच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये रणवीर क्रूर सुलतान अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत झळकणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. इतकंच नव्हे तर भावनिक आणि मानसिकदृष्ट्या खिल्जीचं पात्रं रंगवण्यासाठी त्याने काही दिवस एकटं राहण्याचाही निर्णय घेतला होता.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

अलाउद्दीन खिल्जीचीची भूमिका त्याने इतकी गंभीरपणे घेतली होती की, त्या पात्राच्या वलयातून बाहेर येण्यासाठी रणवीरला मानसोपचार तज्ज्ञाची भेट घ्यावी लागली होती. ‘पद्मावती’च्या निमित्ताने कलाकारांचं योगदान, त्यांची समर्पक वृत्ती आणि मेहनत या साऱ्याचं फळ त्यांना मिळणार का हे १ डिसेंबरनंतर कळेलच. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील मुख्य कलाकारांचे लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आले होते. तेव्हापासून चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor ranveer singh rushed to hospital padmavati movie deepika padukone shahid kapoor
First published on: 06-10-2017 at 10:46 IST