बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज होणारी स्टार किड सारा अली खान सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहे. साराचा बी- टाऊनमधील वावर पाहता एकाएकी गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रत्येक हालचालीवर माध्यमांच्याही नजरा असल्याचं लक्षात येतंय. सैफच्या या लाडक्या मुलीने नुकतीच अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या फॅशन शोला हजेरी लावली होती. अबू आणि संदीप या नावाजलेल्या फॅशन डिझायनरच्या वेडिंग स्पेशल कलेक्शनच्या निमित्ताने या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनीच डिझाईन केलेल्या एका सुरेख ड्रेसमध्ये सारा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली. तेव्हा सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. गुलाबी रंगाचा लेहंगा आणि चंदेरी रंगाचा क्रॉप टॉप घातलेली सारा सुरेख दिसत होती.

कोणत्याही भडक रंगाचा वापर नसताना आणि कमीत कमी डिझायनर ज्वेलरीचा वापर करत साराचा हा लूक साकारण्यात आला होता. यावेळी तिच्यासोबत आई अमृता सिंगही उपस्थित होती. सारासोबतच इतरही बॉलिवूड सेलिब्रिटींनी या फॅशन शोला हजेरी लावली होती. मुख्य म्हणजे सोनम कपूर या फॅशन शोमध्ये शोस्टॉपर होती. तिच्या अदांनी पुन्हा एकदा सर्वांना घायाळ केलं. पण, फॅशनिस्टाच्या या अदांना टक्कर दिली ती म्हणजे साराने. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता नंदानेसुद्धा हजेरी लावली होती.

वाचा : सारा अली खानने केली सलॉन मॅनेजरला शिवीगाळ!

https://www.instagram.com/p/BW0PfzPjGy3/

https://www.instagram.com/p/BW2hM4OAd-g/

दरम्यान, सध्या बॉलिवूडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांना सारा हजेरी लावतेय. ती ‘केदारनाथ’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत सारा तिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटातून स्क्रीन शेअर करणार आहे. तेव्हा आता सैफची ही लाडकी लेक प्रेक्षकांची मनं जिंकते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, साराचं फॅन फॉलोइंग पाहता तिने या कलाविश्वात एक प्रकारे स्वत:ची जागा केली असल्याचंही म्हटलं जातंय.

https://www.instagram.com/p/BW2uRUrAPpX/

https://www.instagram.com/p/BW0XkcMDzO2/