बॉलिवूड कलाकार त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याकडे नेहमीच लक्ष देतात. फिटनेस, व्यायाम, डाएट याचाही सेलिब्रिटी गांभीर्याने विचार करतात. काही सेलिब्रिटी तर त्यांच्या फिटनेसमुळेही ओळखले जातात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. योगा, व्यायाम, सकस आहार यांच्या बळावर मलायकाने शारीरिक सुदृढतेला आजवर नेहमीच प्राधान्य दिलं आहे. आता तर तिला जिममध्ये एक नवी मैत्रिणही भेटली आहे. ही मैत्रिण म्हणजे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान.

मलायकाने नुकतंच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सारासोबत व्यायाम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. करिना आणि सैफसोबत असलेल्या मैत्रीमुळे मलायकाची सारासोबत चांगलीच गट्टी जमली आहे. सारासोबतचा जिममधील फोटो पोस्ट करत मलायकाने त्यासोबत मजेशीर कॅप्शनही लिहिलं आहे. तिचं हे कॅप्शन आणि फोटो पाहता जिम सेशन्समध्येही धमाल होत असणार असंच म्हणावं लागेल.

https://www.instagram.com/p/BUq6LNolw-R/

https://www.instagram.com/p/BUrVD9xgMej/

वाचा: सैफची मुलगी म्हणते, किस करण्यात गैर काय?

दरम्यान, सारा अली खान सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणावर जास्त लक्ष देत आहे. अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटातून ती बॉलिवूड पदार्पण करणार असून, अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पदार्पणाच्या चर्चांसोबतच सारा आणि हर्षवर्धन कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनाही बरंच उधाण आलं आहे. सारा आणि हर्षवर्धन एकमेकांना डेट करत असून, बऱ्याचदा त्यांना एकत्र पाहण्यात आलं आहे.

वाचा: …या आहेत बॉलिवूडमधील ‘सिंगल मदर्स’

https://www.instagram.com/p/BUrX9NrgXlg/

https://www.instagram.com/p/BUl9-r5FwJT/