क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या अनेक प्रेमी युगुलांना ‘रिलेशनशिप गोल्स’ देत आहे. त्यांचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात चर्चेत येतो आणि व्हायरलही होतो. दिवाळीच्या मुहूर्तावरही ही सर्वांचीच आवडती जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, त्यांचा एक नवा फोटो ‘अनुष्का वंडर’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे विराट आणि अनुष्का एका जाहिरातीच्या निमित्ताने एकत्र आले होते हे सर्वांनाच ठाऊक होतं. त्यामुळे ही जाहिरात पाहण्याचीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली. सध्या ही जाहिरात प्रदर्शित झाली नसली तरीही, बऱ्याच ‘फॅन पेजेस’च्या माध्यमातून त्यासंबंधीचे फोटो सर्वांच्या भेटीला आले आहेत.

अवघ्या एका तासात या फोटोला हजारो फॉलोअर्सनी लाइक केलं असून, कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच कमेंट्सही दिल्या आहेत. विराट आधीपासूनच या ‘क्लोथिंग ब्रॅण्ड’चा ‘ब्रॅण्ड अॅम्बेसिडर’ होता. त्याच्या मागोमागच आता अनुष्कासुद्धा या ब्रॅण्डशी जोडली गेली आहे. सोशल मीडियावर चर्चेत असणारा हा फोटो पाहता ‘विरुष्का’च्या चाहत्यांसाठी दिवाळीची ही खास भेट आहे, असं म्हणायला हरकत नाही. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य बऱ्याच गोष्टी सांगून जात आहे.

https://www.instagram.com/p/BaTee_RHrqT/

https://www.instagram.com/p/BY8yAI7Hnty/

विराट आणि अनुष्काच्या रिलेशनशिपमुळे पुन्हा एकदा बॉलिवूड आणि क्रीडा विश्वाचं नातं जोडलं गेलं आहे. सध्याच्या घडीला चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी जोडप्यांच्या यादीत ‘विरुष्का’ अग्रस्थानी आहे, असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे बऱ्याच कार्यक्रमांनाही ते एकत्र हजेरी लावतात. त्यासोबतच विविध मुलाखतींदरम्यान माध्यमांच्या प्रतिनिधींना या दोघांना त्यांच्या रिलेशनशिपविषयी विचारलं असता, ते खुलेपणानं या प्रश्नांची उत्तरं देतात. त्यामुळेच ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

https://www.instagram.com/p/BY8uItngyT6/

https://www.instagram.com/p/BY9rUIMBPTK/