ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’ चित्रपटाचा टीझर गुरुवारी म्हणजेच उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दीपिकाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन टीझर उद्या प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.

‘पद्मावती’चा पोस्टर शेअर करत ‘रानी पद्मावती पधार रही हैं..कल सूर्योदय के साथ’ असं कॅप्शन दिलं आहे. या चित्रपटामध्ये दीपिकाची अतिशय महत्त्वाची भूमिका असणार आहे. दीपिका या चित्रपटात राजपूत राणी ‘पद्मावती’ची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता शाहिद कपूर राजा रतन सिंगच्या भूमिकेत झळकणार आहे. भन्साळींच्या चित्रपटातून बऱ्याचदा प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटामध्ये अलाउद्दिन खिल्जीच्या रुपात दिसेल.

वाचा : ‘नवी वास्तू उभारु, पण त्या जखमा तशाच राहतील’


दीपिका पदुकोण
आणि रणवीर सिंग हे दोघेही संजय लीला भन्साळी यांच्यासह तिसऱ्यांदा एकाच चित्रपटात काम करत आहेत. याआधी या त्रिकुटाने ‘रामलीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाच्या वाट्याला आलेल्या यशानंतर भन्साळींच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.