X

हॉट फोटो शेअर करणाऱ्या मल्लिकाला नेटिझन्स ‘आन्टी’ म्हणतात तेव्हा…

मल्लिका सोशल मीडियाच्या माध्यातून मात्र चाहत्यांच्या संपर्कात आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी चाहत्यांसोबत एक वेगळं नातं बनवू पाहात आहेत. पण, बऱ्याचदा हे प्रयत्न करत असताना काही बाबतीत सेलिब्रिटींचीच खिल्ली उडवली जाते. प्रियांका चोप्रापासून ते अगदी खिलाडी अक्षय कुमारपर्यंत बऱ्याच कलाकारांना आजवर ‘सोशल मीडिया ट्रोलिंग’चा सामना करावा लागला आहे. आता या कलाकारांच्या यादीत आणखी एका सेलिब्रिटीचा समावेश झाला आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे, मल्लिका शेरावत.

चित्रपटसृष्टीमध्ये मल्लिका सध्या सक्रिय नसली तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यातून मात्र चाहत्यांच्या संपर्कात आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटोही शेअर केला. या कृष्णधवल फोटोमध्ये तिचा हॉट लूक पाहायला मिळतोय. पण, मल्लिकाचा हा लूक नेटिझन्सची मनं जिंकू शकला नाही. कारण, हा फोटो शेअर करताच अनेकांनी तो लाइक केला खरा. पण, लगेचच त्यावर विचित्र कमेंट्सही करण्यास सुरुवात केली. या कमेंट्समध्ये बऱ्याचजणांनी ‘आन्टीजी… संपले तुमचे तारुण्यातील दिवस’, असं म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीच्या संपर्कात नसल्यामुळे मल्लिकावर अनेकांनी यावेळी निशाणा साधला.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

काही नेटिझन्सनी तर मर्यादा ओलांडत तिच्या शरीराविषयीही कमेंट्स केल्या. एखाद्या अभिनेत्रीच्या वाढत्या वयामुळे तिची खिल्ली उडवली जाणं ही बाब अत्यंत निराशाजनक असून कलाविश्वातील इतरही कलाकारांना त्यांच्या उतारवयात अशा कमेंट्सचा सामना करावा लागणार का, हाच प्रश्न समोर येत आहे. त्यातही ज्या माध्यमातून सेलिब्रिटींसोबत आपण जोडलो जात आहोत, त्याच माध्यमाचा दुरुपयोग झाल्याचंही लक्षात येत आहे. तेव्हा या सर्व प्रकरणी आता मल्लिका मौन पाळणार, की टीकाकारांना उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published on: October 6, 2017 11:26 am
Outbrain