सनी लिओनी म्हटलं की अनेकांच्याच डोळ्यांसमोर तिचं ‘बेबी डॉल’ हे गाणं उभं राहतं. या एका गाण्यामुळे बी- टाऊनमध्ये ‘बेबी डॉल’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री सनी लिओनी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र असून त्याबद्दल ती फार उत्सुक सुद्धा आहे. या चित्रपटासाठी ती जास्तीत जास्त वेळ देत असून, त्यासंबंबधीचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. मुख्य म्हणजे तिच्या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी प्रॉस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात येत असल्याचं तिच्या पोस्ट पाहूनच लक्षात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच सनीने पूर्ण चेहऱ्यावर हा मेकअप असतानाचा फोटो पोस्ट केला होता. आता तर तिने एक व्हिडिओ शेअर करत अनेकांचच लक्ष वेधलं आहे. या व्हिडिओमध्ये सनी तिच्या चेहऱ्याची कातडी खेचताना दिसत असून, तिच्या चेहऱ्याला जखम झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा चाहत्यांमध्येही तिच्या चेहऱ्याला हे काय झालं, अशा एकाच प्रश्नामुळे चिंताग्रस्त वातावरण पाहायला मिळालं. पण, घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण, हा तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचाच एक भाग असून, प्रॉस्थेटिक मेकअपची किमया काय असते याचीच झलक यातून पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/BZYoSIvgi4k/

https://www.instagram.com/p/BZXibwwgrvf/

वाचा : माझा मुलगा कोणत्याही मुलीला भेटू शकतो- ऋषी कपूर

सनीने हा व्हिडिओ पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये आपण, चित्रपटाच्या सेटवर कशा प्रकारे धमाल करत आहोत हेसुद्धा स्पष्ट केलं आहे. सनीची ही पोस्ट पाहून ती येत्या काळात भयपटात झळकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण, तसं नसल्याचं सनीनेच स्पष्ट केलं आहे. आपला आगामी चित्रपट हा भयपट नसल्याचं तिने कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं. इन्स्टाग्रामवर तिने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या तासाभरातच दोन लाखांपेक्षा अधिक युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला. सनीच्या या आगामी चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता पाहायला मिळत असून, सनी नेमकी कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.