गेल्या महिनाभरापासून सुरु असणारे रोजाचे उपवास आता संपले असून मुस्लिम बांधवांसाठी उत्साहाची पर्वणी आणणाऱ्या ईदचा उत्साह सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. अल्लाहची प्रार्थना करत महिनाभर कडक उपवास केल्यानंतर चंद्राचं दर्शन घेत रमजान ईदला सुरुवात होते. अशा या आनंददायी सणाचा उत्साह बॉलिवूड वर्तुळातही पाहायला मिळत आहे. चाहत्यांसोबत वेगळच नात तयार करणाऱ्या काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, शाहिद कपूर, राणा डग्गुबती, ऋषी कपूर या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

विविध प्रकारचे फोटो पोस्ट करत सेलेब्स या उत्साही वातावरणात सहभागी झाले आहेत. हिरव्या रंगाचा झब्बा घातलेला एक फोटो पोस्ट करत बिग बींनी सर्वांना ‘ईद मुबारक’ म्हटलं आहे. तर, ज्युनियर बच्चन अभिषेकनेसुद्धा त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेते ऋषी कपूर यांनी ‘अमर अकबर अॅन्थोनी’ या चित्रपटातील त्यांनी साकारालेल्या ‘अकबर’चा फोटो पोस्ट करत या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, शिल्पा शेट्टी अनिल कपूर, हुमा कुरेशी या मंडळींनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा : ..असं असत सलमानच्या ‘खान’दानाचं ईद सेलिब्रेशन