बॉलिवूड आणि राजकारण दोन वेगळ्या क्षेत्रांमध्ये समतोल साधत या दोन्ही क्षेत्रात आपली छाप पाडणाऱ्या अभिनेता विनोद खन्ना यांचं गुरुवारी निधन झालं. एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या विनोद खन्ना यांच्या जाण्यामुळे चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. अशा या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्याला बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली.

सुपरस्टार रजनीकांत, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, ऋषी कपूर, श्रद्धा कपूर, वरुण धवन या कलाकारांनी आणि चित्रपटसृष्टीशी संलग्न इतरही काही व्यक्तींनी विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहिली. ‘माझ्या प्रिय मित्रा… तू नेहमीच स्मरणात राहशील’, असं ट्विट करत ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी या ‘दयावान’ अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली. करण जोहरनेही ट्विटरवरुन विनोदजींना श्रद्धांजली वाहात ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा ग्रॅण्ड प्रिमियर शो रद्द केल्याचं जाहीर केलं.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
pune crime news, life imprisonment, man who killed his wife
पुणे: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर तब्बल ३७ वार करून खून करणाऱ्या तरुणास जन्मठेप

‘अमर अकबर अँथनी’ या गाजलेल्या चित्रपटामध्ये विनोदजींसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या अभिनेता ऋषी कपूर यांनी एक फोटो ट्विट करत ‘अमर… तुझी आठवण कायमच येत राहील’, असं कॅप्शन लिहिलं आहे. इतकंच नव्हे तर ऋषी कपूर यांनी ट्विटर डीपी बदलत त्या ठिकाणीसुद्धा विनोदजींचाच फोटो लावत त्यांना श्रद्धांजली वाहिली. विनोद खन्ना यांच्या निधनाचे वृत्त कळताच फक्त चित्रपटसृष्टीतीलच नाही, तर क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी ट्विटरवरुन विनोदजींना श्रद्धांजली वाहिली.