बॉलिवूडच्या कॉमेडी किंग गोविंदासाठी हे वर्ष फारच खडतर आहे असंच म्हणावं लागेल. नुकताच त्याचा आलेला ‘आ गया हिरो’ सिनेमा तिकीट बारीवर सपशेल आपटला. तिकीट बारीवरच हा सिनेमा अयशस्वी ठरला असे नाही तर प्रेक्षकांचे मन जिंकण्यातही गोविंदाला यश आले नाही. पण आता अभिनेता, माजी खासदार गोविंदाला कर विभागासमोर उभे राहावे लागणार आहे. ७० लाख रुपयांचा सेवा कर न भरल्याने त्याला समन्स पाठवण्यात आला आहे.

येत्या काही दिवसांत ७० लाखांची थकबाकी भरेन असे आश्वासन गोविंदाने स्वतः जुहू ऑफिसमध्ये जाऊन दिल्याची माहिती कर विभागातील अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. गोविंदाला या प्रकरणासंदर्भात फोन आणि मेसेज केले असता त्याने प्रतिक्रिया देणे टाळले.
कर विभागातील अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या तीन वर्षांची गोविंदाची बॅलन्सशीट पाहण्यात आली आहे. या काळात त्याने वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती, अभिनय यांमधून सुमारे पाच कोटींची कमाई केली आहे.

Amir Khan Video Supporting Congress Asking for 15 lakhs
“जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श

या मिळकतीतून गोविंदाने ७० लाख रुपयांचा कर भरणे अपेक्षित होते. पण समन्स येईपर्यंत त्याने हा कर भरलाच नव्हता. समन्स देऊनही गोविंदाने त्याला उत्तर देणे जरुरीचे समजले नाही. शेवटी जुहूच्या राहत्या घरी गोविंदाचा जबाब नोंदवण्यासाठी अधिकाऱ्यांना जावे लागले. पण तेव्हा गोविंदा घरी नव्हता. शेवटी गोविंदाला त्याच्या ऑफिसमध्ये गाठून त्याचा जबाब नोंदवण्यात आला. यात त्याला कर विभागाच्या जुहू कार्यालयात हजेरी लावण्यासही सांगण्यात आले होते.