आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस सारखाच नसतो. दरदिवशी काही नव्या गोष्टींसोबतच प्रत्येकाच्या जीवनशैलीतही काही महत्त्वाचे बदल होत असतात. मुख्य म्हणजे आपण ज्या समाजात, ज्या लोकांमध्ये वावरतो त्यांच्यासोबत आपल्या जीवनशैलीमध्येही महत्त्वाचे बदल होतात ज्याचा अनेकांनाच हेवा वाटतो. सेलिब्रिटींचं आयुष्य तसच काहीसं असतं. त्यांच्या राहणीमानामध्ये असणारा थाट पाहून अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो. अशाच राजेशाही थाटातील राहणीमानासाठी ओळखलं जाणारं एक नाव म्हणजे निर्माता- दिग्दर्शक करण जोहर. आपल्या मुलांच्या खोलीपासून ते अगदी घरातील आणि ऑफिसमधील खुर्चीपर्यंत सर्वच ठिकाणी त्याचा हा थाट पाहायला मिळतो.

करणच्या याच राहणीमानातील जवळची एक गोष्ट म्हणजे त्याच्या हॅण्डबॅग्स. करणच्या पेहरावामध्ये त्याच्या हॅण्डबॅग्स अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. एअरपोर्टपासून ते अगदी पुरस्कार सोहळ्यांपर्यंत आणि परदेश वाऱ्यांमध्ये त्याच्या लाखामोलाच्या हॅण्डबॅग्स पाहायला मिळतात. करणने स्वत:च एका मुलाखतीत या सर्व गोष्टीविषयी असलेलं आपलं वेड स्पष्ट केलं होतं. त्यातही हॅण्डबॅग्सला त्याच्यालेखी फार महत्त्वाचं स्थान आहे. चला तर मग करणच्या या बॅग्सविषयी आणखी थोडं जाणून घेऊया…


वरील फोटोमध्ये दिसणारी बॅग ‘गुची टोट’ Gucci tote या ब्रॅण्डची असून त्यावरील एम्ब्रॉयडरी अनेकांचेच लक्ष वेधत आहे. रागीट मांजर असलेली एम्ब्रॉयडरी आणि त्यामध्ये असणारी रंगसंगती बॅगची शोभा वाढवत आहे. केजोच्या या बॅगची किंमत अनेकांनाच थक्क करतेय कारण या किंमतीमध्ये सर्वसामान्य व्यक्ती एक युरोप टूर करुन येऊ शकतात. या बॅगची किंमत आहे १.५ लाख रुपये.


या फोटोमध्ये दिसणारी ही बॅग ‘लुईस विटन एक्स सुप्रीम एपी किपल बॅन्जोलिएरे’ची Louis Vuitton x Supreme Epi Keepall Bandouliere bag – a limited edition असून ही लिमिटेड एडिशन विभागातील बॅग आहे. भारतीय चलनानुसार या बॅगची किंमत जवळपास दोन लाख रुपये इतकी असून, ही बॅग असणारा करण एकमेव भारतीय असल्याचंही म्हटलं जातंय.

https://www.instagram.com/p/BX3Gs3XgRue/

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

बसला ना धक्का? करणच्या कलेक्शनमधील पुढची बॅग आहे, नुकतीच पाहण्यात आलेली त्याची मिनी सुटकेस. त्याच्या या बॅगवर सुरेख प्रिंटही पाहायल मिळत आहे. ‘द गुची कुरिअर जीजी सुप्रीम सुटकेस’ The Gucci Courrier GG Supreme suitcase या लक्झरी ब्रॅण्डची ही बॅग असून, तिची किंमत जवळपास अडीच लाख रुपये इतकी आहे. करणकडे असलेलं हे कलेक्श बरंच मोठं असणार असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळे ‘शौक बडी चीज है…’ असं म्हणतात ते खरंच आहे यावर विश्वास बसतो.