बॉलिवूड आणि सेलिब्रेशन, सेलिब्रिटी पार्टी हे एकमेकांशी संलग्न विषय आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अशाच एका बर्थडे बॅशमध्ये तारे- तारकांची मांदियाळी पाहायला मिळाली. निमित्त होतं निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या वाढदिवसाचं. करण जोहर हे बॉलिवूडमधील सर्वांच्या आवडीचं व्यक्तिमत्त्वं. कोणासाठी तो गुरु आहे, कोणासाठी मार्गदर्शक तर कोणासाठी जिवाभावाचा मित्र. ‘केजो’च्या बर्थडे बॅशला त्याला शुभेच्छा देण्यासाठी बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण, या पार्टीत लक्ष वेधलं ते म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा आणि शाहरुखचा मुलगा आर्यनने.

शाहरुख, आर्यन आणि सारा यांचा एक फोटोही सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहता सारा, आर्यन आणि शाहरुखची चांगलीच गट्टी जमल्याचं पाहायला मिळतंय. केजोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये अभिनेता अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि इतरही सेलिब्रिटी आले होते. छायाचित्रकारांना यापैकी जवळपास सर्वच कलाकारांचे फोटो काढण्याची संधी मिळाली. पण, नेमकं शाहरुख या पार्टीमध्ये कधी आला याचा सुगावा प्रसारमाध्यमांनाही लागला नाही.

PHOTO : सारा-हर्षवर्धनची ‘व्हायरल’ डिनर डेट

दरम्यान, आर्यन आणि सारा यांचा एकत्र असा हा पहिलाच फोटो सर्वांसमोर आल्यामुळे सध्या तो चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो पाहता, हे दोन्ही स्टारकिड्स येत्या काळात स्क्रीन शेअर करतील असा अंदाज वर्तवण्यास सुरुवात झालीये. पण, याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही हेही तितकंच खरं. सारा अली खान गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरला सारा डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या डिनर डेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे बॉलिवूड वर्तुळात सध्याच्या घडीला बरंच काही घडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

shah-rukh-khan-aryan-khan

aamir-khan2

alia-sid

anushka-aishwarya

karan-1-1

karan-12

katrina-deepika

sanjay-dutt-maanyata