शाहरुख खानने ‘रईस’ या चित्रपटात दारु माफियाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्या भूमिकेतून गुजराती अंदाजही पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा हे गुजरात कनेक्शन त्याच्या आयुष्यात आलं आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातून शाहरुख खान एका गुजराती मुलीचे म्हणजेच अनुष्का साकारत असलेल्या पात्राचे नखरे झेलताना दिसणार आहे.

नुकतेच त्याने आणि इम्तियाझ अलीने अहमदाबादमध्ये चाहत्यांची भेट घेत या चित्रपटातील राधा हे गाणं लाँच केलं. या अहमदाबाद दौऱ्यामध्ये शाहरुखने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या खास भेटीचा आनंद व्यक्त करत एक फोटोही पोस्ट केला आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांची भेट घेताना इम्तियाज अलीसुद्धा शाहरुखसोबत उपस्थित होता.

‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये सर्वाधिक सेजल नावाच्या मुली असणाऱ्या शहराला किंग खानने भेट देण्याचं ठरवलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या या आवाहनाला जवळपास ७००० सेजल नावाच्या मुलींनी प्रतिसाद दिला आणि त्यानंतर शाहरुखने थेट अहमदाबाद गाठलं.

वाचा : आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीला डेट करतोय हा स्टार किड 

किंग खान येणार म्हटल्यावर चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मुख्य म्हणजे किंग खानसुद्धा चाहत्यांना फार महत्त्वं देतो. दरम्यान, सध्या सेजल नावांच्या मुलींच्या शहराला भेट देण्यात व्यस्त असणारा शाहरुख ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटात ‘हॅरी’ या एका टूर गाइडच्या भूमिकेत झळकणार असून, अनुष्का ‘सेजल’ नावाच्या गुजराती मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे.

वाचा : .. हे आहेत ऑनस्क्रिन आई-वडिलांनाच डेट करणारे सेलिब्रिटी