‘जुडवा २’ चित्रपटामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते आहे. पण, तापसीला मात्र ही भूमिका साकारताना एका वेगळ्याच गोष्टीचं दडपण आलं होतं. ‘बेबी’, ‘नाम शबाना’ या चित्रपटांमध्ये धाडसी भूमिकांना न्याय देणारी तापसी नेमकी कोणत्या गोष्टीमुळे अस्वस्थ होती, हाच प्रश्न तुमच्याही मनात घर करतोय ना? चित्रपटामध्ये बिकिनीतील दृश्य चित्रीत करताना आपण या दृश्याला न्याय देऊ शकतो ना, याबद्दल तापसी साशंक होती. कारण, तिच्यासमोर बी- टाऊनमधील सर्वात मादक अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं आव्हान होतं.

जॅकलिन ही तिच्या सौंदर्यासाठी नेहमीच नावाजली जाते. कमनीय बांधा असलेल्या जॅकलिनला याआधी आपण चित्रपटांमध्ये बिकिनीत पाहिलंय. पण, तापसी अशा कपड्यांमध्ये दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबद्दल तापसी म्हणाली की, मी हॉलिडेसाठी बाहेर जाते तेव्हा बिकिनी घालते. त्यामुळे चित्रपटात बिकिनी घालावी की घालू नये असा प्रश्न मला पडला नाही. मात्र, रुपेरी पडद्यावर बिकिनीमध्ये झळकण्यासाठी माझी शरिरयष्टी योग्य आहे का, असा प्रश्न आवर्जून पडला. कारण, जॅकलीन ही बिकिनीसाठी उत्तम शरीररष्टी असलेली अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्यासमोर मी वेगळी दिसणार नाही ना याचे मला सतत दडपण येत होते. त्याचसोबत, पहिल्यांदाच मी वेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर दिसणार असल्याने त्यांची काय प्रतिक्रिया असेल याचाही विचार माझ्या मनात येत होता.

https://www.instagram.com/p/BZA986iH-HP/

वाचा : रेखा आजही अमिताभ यांच्या ‘या’ दोन गुणांच्या प्रेमात

दरम्यान, ‘जुडवा २’ मधील तापसीच्या बिकिनी फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. तिला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले होते. पण, त्यालाही तिने सडेतोड उत्तर दिलं. तिच्या बिकिनी फोटोंची अनेकांनी प्रशंसाही केली, त्यामुळे तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं असणार यात शंका नाही. तापसी पन्नू, जॅकलिन फर्नांडिस आणि वरुण धवन यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘जु़डवा २’ हा चित्रपट २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्यामुळे सध्या रसिकांमध्ये याच चित्रपटाची चर्चा सुरु आहे.