गेल्या काही दिवसांपासून चित्रपट वर्तुळामध्ये सेन्सॉरसोबत बऱ्याच चित्रपटांचा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. अश्लील आणि आक्षेपार्ह दृश्यांची कारणं देत ज्या सेन्सॉरने आजवर काही चित्रपटांना प्रमाणित करण्यात अडचणी निर्माण केल्या त्या सेन्सॉरला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाच्या ट्रेलरने सणसणीत उत्तर दिलं आहे. समाजाने आखलेलं जीवन जगताना आपल्या भावनांचं बलिदान देणाऱ्या महिलांच्या मनातील उत्कट भावना या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.

सेन्सॉरसोबत झालेल्या वादावर पुन्हा एकदा प्रकाश टाकत सुरुवात होणाऱ्या या ट्रेलरमध्ये ‘बिवी हो, शौहर बनने की कोशिश मत करो’, या संवादाने सुरुवात होत आहे. कलाकारांचा तगडा अभिनय या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय चित्रपटामध्ये एका वेगळ्या काळाची सुरुवात झाली असून ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’चा ट्रेलर त्याचच एक उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘हमारी आजादी से आप डरते क्यो हैं?’ हा प्रश्न अनेकांनाच पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडत आहे. रत्ना पाठक शाह, कोंकणा सेनशर्मा या अभिनेत्रींसोबतच मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादीसुद्धा या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय अहाना कुमरा आणि प्लाबिता बोरठाकूर या अभिनेत्रीसुद्धा ‘लिपस्टिक…..’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

२१ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावरही चांगला प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. एका वेगळ्या कथानकाला चौकटीबाहेर जात सादर करण्याचा प्रयत्न दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव यांनी केला आहे. चार महिलांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. रोजचं साचेबद्ध आयुष्य जगत आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. त्यासाठी त्या नेमकं काय करतात आणि त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं याचं वास्तवदर्शी चित्रीकरण या चित्रपटात केल्याचं पाहायला मिळणार आहे.