कलाकार म्हटलं की त्यांना अपेक्षा असते ती म्हणजे प्रेक्षकांची दाद आणि ठराविक पुरस्कारांची. त्यातही काही कलाकार त्यांच्या अभिनयाने वेगळ्याच प्रकारची छाप प्रेक्षकांवर सोडतात. अशाच काही कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे रघुबीर यादव. त्यांचं नाव असं अचानक प्रकाशझोतात येण्यामागचं कारण ठरतोय नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘न्यूटन’.

अमित मसुरकर दिग्दर्शित या चित्रपटाला ऑस्करच्या शर्यतीतही जागा मिळाली आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबतच यादव यांचंही नाव समोर येत आहे. ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळवलेला ‘न्यूटन’ हा रघुबीर यादव यांचा आठवा चित्रपट ठरला आहे. त्यांनी आजवर विविध भूमिका रुपेरी पडद्यावर अक्षरश: जिवंत केल्या आहेत. त्यामुळे आतातरी त्यांच्या हातात ऑस्करची बाहुली स्थिरावेल अशी अनेकांनाच अपेक्षा आहे. चला तर मग त्यांच्या अभिनयाचा दर्जेदार नमुना असलेले याआधीचे चित्रपट आहेत तरी कोणते यावर नजर टाकूया..

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

सलाम बॉम्बे!-
या चित्रपटामध्ये रघुबीर यादव यांनी ‘चिल्लम’ ही भूमिका साकारली होती. भारताकडून ऑस्करसाठी या चित्रपटाचं नाव पुढे करण्यात आलं होतं. परदेशी भाषा विभासाठी ‘सलाम बॉम्बे!’ची निवड करण्यात आली होती. आतापर्यंत साकारण्यात आलेल्या १००० सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीतही याचा समावेश करण्यात आला आहे.

रुदाली-
राजस्थानातील पारंपारिक रुढींचं चित्रण करण्यात आलेला एक अफलातून चित्रपट म्हणजे ‘रुदाली’. डिंपल कपाडिया यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला अनेकांचीच पसंती मिळाली होती. या चित्रपटात रघुबीर यादव यांनी ‘बुधवा’ची भूमिका साकारली होती.

बँडिट क्वीन-
‘फूलन देवी’च्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा ‘बॅँडिट क्वीन’ हा चित्रपटही ऑस्करच्या शर्यतीत होता. ६७ व्या अकॅडमी अवॉर्ड्ससाठी शेखर कपूर दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव पुढे करण्यात आलं होतं. रघुबीर यादव यांनी या चित्रपटात ‘मढो’ ही भूमिका साकारली होती.

१९४७ : अर्थ-
१९९९ मध्ये पार पडलेल्या अकॅडमी अवॉर्ड्ससाठी ‘१९४७ : अर्थ’ या चित्रपटाचं नाव भारतातर्फे पुढे करण्यात आलं होतं. परदेशी भाषा विभागासाठी निवडला गेलेला हा चित्रपट बापसी सिधवा यांच्या ‘क्रॅकिंग इंडिया’ या कादंबरीवर आधारित होता.

लगान-
ऑस्करच्या शर्यतीत स्तान मिळवलेल्या चित्रपटांच्या यादीतून ‘लगान’चं नाव विसरुन कसं चालेल? २००२ मध्ये ऑस्कर पुरस्कारांसाठी या चित्रपटाला परदेशी भाषा विभागामध्ये स्थान मिळालं होतं. ‘१९४७ : अर्थ’ या चित्रपटातील भूमिकेच्या बळावरच यादव यांना ‘लगान’मधील भूमिका मिळाली होती. या चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या शेतकऱ्याची व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

वॉटर-
हा इंडो-कॅनेडियन चित्रपट ‘वॉटर’ या कादंबरीवर आधारित होता. दीपा मेहता दिग्दर्शित या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली होती. भारतातील वाराणासीमध्ये विध्वा महिलांच्या परिस्थितीवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला होता. या चित्रपटात रघुबीर यादव यांनी विध्वा महिलेपर्यंत अफू पोहोचवणाऱ्या ‘गुलाबी’ या तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाने कौतुकास्पद कामगिरी बजावली होती.

पिपली लाईव्ह-
८३व्या अकॅडमी अवॉर्डसाठी परदेशी भाषा विभागात भारताकडून ‘पिपली लाईव्ह’ या चित्रपटाचं नाव पुढे करण्यात आलं होतं. रघुबीर यादव यांनी या चित्रपटात दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या ‘बुधिया’ या शेतकऱ्याची भूमिका साकारली होती.
टेलिव्हिजन अभिनेता, संगीत दिग्दर्शक, गायक, सेट डिझायनर अशा क्षेत्रांतही ते तरबेज आहेत. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ येथून त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे.