कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचा क्लायमॅक्स नेमका कसा असेल हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. किंबहुना प्रेक्षकांनी भाईजान सलमानची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आधीपासून अॅडव्हान्स बुकिंगही केल्याचं पाहायला मिळालं. या सर्व उत्साहाच्या वातावरणात एका गोष्टीने मात्र विरजण घातलं. शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणाऱ्या या चित्रपटाचील काही दृश्यं सोशल नेटव्हर्किंग साइट्सवर व्हायरल झाली.

सलमानच्या या चित्रपटाचं मुख्य आकर्षण म्हणजे शाहरुखची पाहुण्या कलाकाराची भूमिका. किंग खान आणि हा दबंग अभिनेता स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे चाहत्यांमध्येही त्याबद्दल बरीच उत्सुकता पाहायला मिळाली होती. या चित्रपटात शाहरुख एका जादूगाराच्या भूमिकेत दिसला असून, त्याचं पात्रंही कथानकाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर लीक झालेले हे व्हिडिओ डिलीट करण्यात आले आहेत. पण, तरीही सलमान शाहरुखचे हे फोटो मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. युएई, बाहरिन आणि कतारमध्ये ‘ट्युबलाइट’ एक दिवस आधीच प्रदर्शित झाला होता. त्यामुळे ही लीक दृश्ये आणि फोटो त्या ठिकाणांहूनच व्हायरल झाल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : Tubelight Review : …अखेर ‘ट्युबलाइट’ पेटली रेssss!

shahrukh-1-1

shahrukh-2

shahrukh-2-1

लीक झालेल्या या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये शाहरूखच्या चेहऱ्यावर एक टॅटू बनविल्याचंही पाहायला मिळत आहे. जवळपास, दहा वर्षांनंतर बॉलिवूडचे हे दोन सुपरस्टार ‘ट्यूबलाइट’च्या निमित्ताने स्क्रीन शेअर करत आहेत.

shahrukh-3

वाचा : ‘कोणत्याही मुलीला किस केल्यास मी तुझे ओठ चिरेन’