गाण्याचा मुखडा ऐकताच अनेकाना मुमताजची पुस्तकात डोकं खूपसून बसलेल्या राजेश खन्नाला बाहेर काढण्याची नटखट आव्हानात्मक अदा नक्कीच आठवली असेल. अभिनेत्री आपल्या सौंदर्य व नृत्याने नायकाच्या मनाची घालमेल करणारी गाणी हिंदी चित्रपटातून अधूनमधून येतच असतात पण हे त्यातील सर्वाधिक मोहक व लोकप्रिय गाणे.

बिंदीया चमकेगी
चुडी खनकेगी
तेरी निंद उडी
तो उडजाए
कजरा महकेगा

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Sharad pawar on Udyanraje bhosale lok sabha election
“राजेंबद्दल आम्ही प्रजा…”, उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, भाजपाला टोला
Uddhav Thackeray Patrika Major Change On 1st May
उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत ‘१ मे’ला मोठा बदल, यश येईल भाळी; ज्योतिषी उल्हास गुप्ते सांगतायत नेमकं घडणार काय?

गच्चीवर राजेश खन्ना पुस्तकात डोकावला असतानाच मुमताज मडके घेऊन छान नाचायला/ गायला सुरुवात करतेय. गडद रेशमी रंगाच्या वस्त्रात आणि दोन्ही हातातील भरपूर बांगड्यांनी तिचे व्यक्तिमत्व अधिकच खुललयं. ‘दो रास्ते’ (१९६९) सर्वच गाणी सुपर हिट. हे तर जरा जास्तच. गीतकार आनंद बक्षी व संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यानी या गाण्याचा ठेका छानच पकडलाय.

मैने माना हुआ तू दीवाना
जुल्म तेरे साथ हुआ
मै कहा ले जाऊ
अपनी लांग का लष्कारा

मुमताज आपल्या प्रेमासाठी राजेशने वेळ द्यावा हे हक्काने सांगताना त्याच्या हातातील पुस्तक त्याने बाजूला ठेवून आपले नृत्य पाहावे हे मनमुरादपणे सांगते. राजेश केवळ कटाक्षानेही प्रेम व्यक्त करण्यात हुशार. ते करतानाच आपण पटकन मुमताजला प्रतिसाद द्यायचा नाही असाही निर्णय घेताना दिसतो. म्हणूनच तर या मस्तीखोर गाण्यातील रंजकता खुमासदार झाली आहे.

बोले कंगना
किसी का ओ सजना
जवानी पे जोर नही…

एक्स्प्रेशन मेलडी ज्याला म्हणतात म्हणजेच गाण्याचा एकूणच भावार्थ पार्श्वगायनात पकडणे हे जुन्या चित्रपट गीतांचे खास वैशिष्ट्य येथेही जाणवते. लता मंगेशकर यांनी हे गाणे चित्रीकरणाच्या सूरात गायलयं. खरं तर चित्रीकरण नंतर होते पण गातानाच ते पडद्यावर कसे असेल/ दिसेल याची त्याना दिग्दर्शक राज खोसलानी छान कल्पना दिली असणार. लताजींच्या गायकीचा मूड मुमताजने उत्कृष्टपणे पकडलाय. मनसोक्त नाचत नाचत ती एक प्रकारे राजेश खन्नाला आव्हानच देतेय. तिची ही आतुरता पाहून आता राजेश तिला जवळ घेतो आणि तिचा स्वर मूळ ढंग राखतच प्रेमळ बनतो.

मैने तुझसे मोहब्बत की है
गुलामी नही की बलमा
दिल किसीका तुटे
मै तो खेलूंगी
मै तो छेडूंगी

आता प्रेमाची साथ लाभताच मुमताज अधिकच मोकळेपणाने गाते नाचते. त्यामुळे गाणे अधिकच बहारदार होते. राज खोसलाच्या दिग्दर्शनीय वैशिष्ट्यातील एक म्हणजे गाण्याचे अप्रतिम टेकिंग. गाण्याच्या मूडनुसार ते गाणे पडद्यावर येणारच. या नटखट गाण्यात तर दिग्दर्शनीय टच खूपच दिसतोय. मुमताज नृत्यासाठी लोकप्रिय होतीच पण येथे तर तिला जणू मैदानच मोकळे मिळाले आणि जेवढा म्हणून या गाण्यात नृत्याचा रंग भरता येईल तेवढा तिने भरला.

मेरे आंगन बारात लेके साजन
तू जिस रात आयेगा…

गाणे शेवटाकडे जाताना किंचित स्वर हळवा होतो पण तेवढाच. पुन्हा मुळचा तिखटपणा आहेच आणि मुमताज छान हसत खेळत राजेशला कधी ठेंगा दाखवते तर कधी चुडिया. राजेशला इतके गप्प बसण्याची वेळ एकदाच आलीय. आपल्याला पुस्तक वाचू देत, तू बाहेर जा असे जरी मुमताजला त्याने या दीर्घ गाण्यात सुचवले/ तसा प्रयत्नही केला तरी आपल्या प्रेयसीचे हे झक्कास नृत्य तो एन्जॉय देखिल करतोय हे लपत नाही.

बिंदीया चमकेगी
चुडी खनकेगी…
दिलीप ठाकूर