राजेश खन्ना यांच्या ‘बावर्जी’पासून ते इरफान खानच्या ‘लंच बॉक्स’पर्यंत, सिनेरसिकांना नेहमीच चांगली संहिता, दिग्दर्शन, अभिनय आणि कलाकार अशा पक्वानांनीयुक्त सिनेमांची आस लागलेली असते. त्यातही सिनेमात दाखवण्यात आलेले जेवणातले पदार्थ हाही एक चर्चेचा विषय असतो. बॉलिवूड आणि खाणं हा तसा जवळचा विषय. ‘माँ के हाथ का हलवा और खीर’ हा तर प्रेक्षकांना भावूक करण्यासाठी ठरलेला विषय. पण सिनेरसिकांना त्यांच्या आवडत्या सिनेमांत किंवा आवडत्या कलाकाराने कोणत्या सिनेमात काय जेवण जेवले हे आठवतं का? सगळ्यांचा ऑल टाइम फेवरेट ‘कहो ना प्यार है’… या सिनेमाचेच घ्या ना..

प्रश्नः ‘कहो ना प्यार है’ या सिनेमात लिली आंटी रोहित आणि अमितला कोणता नाश्ता द्यायची?
१.   ऑमलेट
२.   न्युडल्स
३.   चिकन सॅण्डवीच

हृतिक रोशन आणि अमिशा पटेल यांनी या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. हा सिनेमा त्यावेळी सुपर हिट झाला होता. एका रात्रीत अमिशा आणि हृतिकला या सिनेमामुळे स्टारडम मिळाले होते. हृतिकची गाडी करिअरमध्ये पुढे निघून गेली असली तर अमिशाला मात्र नंतर फारसे काम मिळाले नाही आणि तिचे करिअर फार कमी सिनेमांपूरते मर्यादित राहिले.

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर-
प्रश्न- अभिषेक आणि करिष्माने कोणत्या चित्रपटात एकत्र काम केले होते?
उत्तर- हा…. मैने भी प्यार किया है