बॉलिवूड स्टार्स नेहमीच त्यांच्या नवनवीन सिनेमांसाठी, कार्यक्रमांसाठी आणि इतर गोष्टींसाठी प्रसारमाध्यमांच्या गराड्यात असतात. पण त्यातूनही पुढे जाऊन ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही स्वतःचे प्रमोशन करतच असतात. पण तुम्हाला माहित आहे का की हे स्टार्स त्यांच्या अकाऊंटवरुन लाखो रुपयांची तर कधी कोट्यावधी रुपयांची कमाई करतात.

एका अहवालानुसार सेलिब्रेटींना एक ट्विट केल्याचे लाखो रुपये तर मिळतातच शिवाय कोणत्या मोठ्या ब्रॅण्ड संदर्भात ट्विट केले तर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर असणाऱ्या त्यांच्या चाहत्यांच्या संख्येनुसार त्यांना पैसे मिळातात. तर जाणून घेऊया ट्विटरवर टिवटिव करण्यासाठी कोणत्या स्टार्सना किती रुपये मिळतात ते…

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. याशिवाय ती ज्या उत्पादनांसाठी जाहिराती करते त्यासाठीही मानधनाच्या रुपात ती कित्येक कोटीरुपये घेते. याशिवाय तिचे ट्विटरवरही कोटींच्या घरात फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर प्रियांकाचे आतापर्यंत अंदाजे १६,०४६,८३० फॉलोअर्स आहेत.

प्रियांकाने आतापर्यंत १९,४०८ ट्विट केले आहेत. ज्या ब्रॅण्डचे प्रमोशन ही कलाकार मंडळी ट्विटरच्या माध्यमातून करतात त्याबदल्यात प्रत्येक क्लिकचे त्यांना पैसे मिळतात. जर प्रियांकाने कोणत्याही ब्रॅण्डचे १ हजार ट्विट जरी केले असतील तर त्याबदल्यात तिने आतापर्यंत कोट्यावधींची कमाई केली असेल.

बॉलिवूड शॉटगन शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षी सिन्हाही सोशल मीडियावर फार सक्रीय असते. तीसुद्धा विविध ब्रॅण्डचे ट्विट करत असते. रिपोर्टनुसार सोनाक्षी ब्रॅण्डच्या एका ट्विटसाठी अंदाजे ४ ते ५ लाख रुपये घेते. यावरुन जर सोनाक्षीने एका महिन्यात कुठल्या ब्रॅण्डचे २० ट्विट जरी केले तरी महिन्याभरात तिची चांगलीच कमाई होते.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचे ९,५४९,२१४ फॉलोअर्स आहेत. शाहिदने आतापर्यंत ६ हजारांहून अधिक ट्विट केले आहेत. शाहिदही कोणत्याही ब्रॅण्डच्या उत्पादनाचे ट्विट करायचे असेल तर साधारणतः १० ते १२ लाख रुपये घेतो.

सेलिब्रिटींच्या याच यादीत आणखी एका नावाचा समावेश आहे. ते नाव म्हणजे विनोदवीर कपिल शर्मा. कॉमेडी किंग कपिल शर्माही ट्विटरवर फार सक्रीय असतो. मीडिया रिपोर्टनुसार कपिलने होंडासोबत ट्विटरचा करार केला आहे. कपिल ट्विटरवर ‘होंडा’ या ब्रॅण्डला प्रमोट करत असतो आणि प्रत्येक ट्विटसाठी सुमारे १ ते ५ लाख रुपये घेतो.