सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि कोणती व्यक्ती रातोरात प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. आता हेच पाहा ना काही दिवसांपूर्वी एका मुलाचा आगळ्या वेगळ्या पोझमध्ये काढलेला फोटो तुफान व्हायरल झाला होता. बरेचजण त्या फोटोबद्दलच बोलत होते. एवढेच नाही तर त्याला हे कसे काय सुचले? असा फोटो कोण कसं काढू शकतं? अशा एक ना अनेक गोष्टींची चर्चा करण्यात आली.

कथा पडद्यामागचीः रंगभूमीची साधना ही एका तपाप्रमाणे- किशोरी शहाणे- विज

कोणी एका तरूणानं एकदम ‘लय भारी’ पोजमध्ये अपलोड केलेला हा फोटो सोशल मीडियावर एवढा व्हायरल होईल याची कल्पनाही त्याने केली नसेल हे नक्की! पण, आता या व्हायरल झालेल्या फोटोची दखल अनेकांनी घेण्यास सुरुवात केली आहे. काहींनी या फोटोचे धमाल विनोदी मिम्सही तयार केले आहेत.

दरम्यान, फक्त सर्वसामान्य जनताच सोशल मीडियावर अशा गोष्टींवर चर्चा करते असं नाही. तर सेलिब्रिटीही अशा व्हायरल गोष्टींवर लक्ष ठेवून असतात हेसुद्धा या फोटोमुळे उघड झालं आहे. सेलिब्रिटी अशा गोष्टींवर नेहमीच अशा भाष्य करत नसतीलही. पण, म्हणून त्यांना आपल्या आजूबाजूला काय चालतं याची माहिती नाही असे होत नाही. आता अभिनेता रितेश देशमुखचंच घ्या ना… रितेशने हा फोटो पाहिला आणि त्यावर ट्विट करण्याचाही निर्णय घेतला.

त्या मुलाची इतर लोक खिल्ली उडवत असताना रितेशने मात्र असं टॅलेन्ट फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळतं असं सांगितलं. या व्यक्तीच्या दुसऱ्या पोझमधील फोटोही सध्या ट्विटरवर चर्चेचा विषय ठरतोय. दरम्यान, ही व्यक्ती कोण आहे याबाबत अजून कोणतीच माहिती मिळाली नाही. या फोटोला आतापर्यंत सोशल मीडियावर आलेल्या एकापेक्षा एक तुफान प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.