भारतातील सर्वात मोठा ‘मनोरंजन टिकीटिंग ब्रँड’ असलेल्या ‘बुकमायशो’ (बीएमएस) कंपनीने ‘मायकुपन्स’ ही मोफत डिस्काऊंट व्हाऊचर्स देणारी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही ज्या चित्रपटगृहाला भेट द्याल त्याच्या आसपासची प्रसिद्ध उपहारगृहे आणि कॉफी शॉपमध्ये या ‘डिस्काऊंट व्हाऊचर्स’चा वापर करणे शक्य होणार आहे. ही सेवा सध्यातरी फक्त मुंबई आणि पुणे येथील ग्राहकांसाठी http://www.bookmyshow.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ग्राहकाने संकेतस्थळावरून चित्रपटासाठीचे बुकींग करताच त्याला चित्रपटगृहाच्या आसपासच्या उपहारगृहांची यादी स्क्रिनवर दिसेल. या यादीतून ग्राहक त्याच्या आवडीच्या उपहागृहासाठीचे डिस्काऊंट कुपन्स निवडू शकतो. ग्राहकांना डिस्काऊंटची ही आकर्षक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘बुकमायशो’ने आगोदरपासूनच सबवे, कॅफे कॉफी डे, बास्किन-रॉबीन्स, मॅड ओव्हर डॉनट्स, केएफसी, पिझ्झा हट सारख्या जवळपास शंभराहून अधिक रेस्टॉरंटशी हातमिळवणी केली आहे.