क्रिकेटच्या मैदानात आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांची बोलती बंद करणारा ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ‘ब्रेट ली’ लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अनइंडियन’ असे ब्रेट लीच्या आगामी बॉलीवूड चित्रपटाचे नाव असून, दिग्दर्शक अनुपम शर्मा चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटात ‘ब्रेट ली’ अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीसोबत रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे.
एका मुलाची आई असलेली मीरा(तनिष्ठा) आणि ऑस्ट्रेलियन शिक्षक वील (ब्रेट ली) यांची प्रेमकथा चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या दोघांसोबतच ज्येष्ठ अभिनेते गुलशन ग्रोवर आणि सुप्रिया पाठक यांचीही चित्रपटात भूमिका आहेत. याशिवाय, चित्रपटात ऑस्ट्रेलियातील काही कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत.