नवी दिल्लीमध्ये आयोजित होणाऱ्या पहिल्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवलची सुरुवात अभिनेता कुणाल कपूरच्या ‘वीरम’ सिनेमाने होणार आहे.
भारतात आयोजित होणाऱ्या आठव्या ब्रिक्स संमेलनाच्या विशेष योजनांचा हिस्सा असलेले हे फेस्टिव्हल दोन ते सहा सप्टेंबरपर्यंत दिल्लीच्या सीरी फोर्ट सभागृहात होणार आहे.
मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार हा ‘वीरम’ सिनेमा एक पिरिएड सिनेमा आहे. प्रसिद्ध कवी शेक्सपिअर यांच्या ‘मैकबेथ’ या कवितेचं रुपांतरण आहे.
‘मला फार आनंद होत आहे की आम्ही पहिले ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आम्ही ‘वीरम’चा प्रिमिअर करत आहोत. आम्ही हा सिनेमा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आता प्रेक्षकांची यावर काय प्रतिक्रिया असणार हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.’ असे अभिनेता कुणाल कपूर म्हणाला.
हा सिनेमा १३ व्या शतकातवर भाष्य करतो. याचा सेट केरळमध्ये लावण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी कुणाल कपूरनेही त्याच्या या सिनेमाचा पहिला लूक ट्विटरवर शेअर केला होता. मैकबेथसारखेच या सिनेमातही यश मिळाल्यानंतरचा चढाव आणि उतार दाखवण्यात आला आहे.
या सिनेमाच्या स्क्रिप्ट आणि कथा यांच्यावर फार काळजीपूर्वक काम केले गेले आहे. या सिनेमातल्या अॅक्शन, संगीत, कलर डिपार्टमेन्ट या विभागांसाठी हॉलिवूडचे तज्ज्ञ वापरण्यात आले आहेत.
या सिनेमाचे दिग्दर्शन जयराज यांनी केले आहे. हा सिनेमा कुख्यात योद्धा चांतू चेकावर याच्यावर आधारित आहे. हा सिनेमा हिंदी, इंग्रजी आणि मल्याळम या तीन भाषांमध्ये जरी बनला असला तरी तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये हा सिनेमा डब करण्यात येणार आहे.