प्रसिध्द अमेरिकन ‘पॉप स्टार’ ब्रिटनी स्पिअर्स लास व्हेगासमधील ‘प्लॅनेट हॉलिवूड रिसॉर्ट अॅण्ड कॅसिनो’मध्ये लाइव्ह परफॉर्मन्स करत होती. ब्रिटनीचा कार्यक्रम ऐन रंगात आला असताना तिने परिधान केलेल्या टॉपच्या मानेमागील स्ट्रिप अचानक उघडल्याने टॉपचा वरचा हिस्सा खाली घरंगळला. काही वेळ ब्रिटनीने टॉप तशाच अवस्थेत हाताने सांभाळून धरला. लगेचच एक बॅक डन्सर तिच्या मदतीला धावून आला. त्याने टॉपची स्ट्रिप लावण्याचा खूप प्रयत्न केला. टॉपची स्ट्रिप लागली आहे असे वाटत असतानाच ती पुन्हा एकदा उघडली. यावेळी अन्य दोन डान्सर तिच्या मदतीला आले. त्यांच्या प्रयत्नाने ब्रिटनीचा टॉप व्यवस्थित बसला असल्याचे वाटत असताना पुन्हा एकदा त्या टॉपने दगा दिला. विशेष म्हणजे हे सर्व सुरू असताना ब्रिटनीने आपल्या परफॉर्मन्समध्ये खंड येऊ दिला नाही. अनेकवेळा प्रयत्न करूनदेखील टॉप व्यवस्थित बसत नसल्याचे लक्षात येताच एका डान्सरने प्रसंगावधान राखत अपला शर्ट काढून ब्रिटनीला परिधान केला. ब्रिटनीने तो शर्ट घालूनच शो पूर्ण केला. ब्रिटीनीसोबत असे पहिल्यांदाच घडत नसून, याआधीदेखील दोनदा शोदरम्यान तिच्यावर वॉर्डरोब मालफंक्शनचा प्रसंग ओढवला आहे.

व्हिडिओ