– दिव्यांगजनांसाठी (अंध व कर्णबधीर) वापरलेल्या ‘अॅक्सेसिब्लिटी फॉरमॅट’च्या वापराचे कौतुक
दिव्यांगजनांना (अंध व कर्णबधीर) चित्रपटाचा अनुभव देण्यासाठी चौर्य या चित्रपटात ‘अक्सेसिब्लिटी फॉरमॅट’ या वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असा प्रयोग प्रथमच केला जात आहे. या अनोख्या प्रयोगाची दखल थेट केंद्र सरकारने घेतली असून, या पुढाकाराचे कौतुक करणारे पत्र भारत सरकारने दिले आहे.
नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या निलेश नवलखा , विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून राजन आमले हे सहनिर्माते आहे. चित्रपटाची प्रस्तुती नवलाखा आर्ट्स व साधना सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमानाने केली आहे. याआधी शाळा, फँड्री, सिद्धांत अशा एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईने केली आहे. आशय सहस्त्रबुद्धे याने या विषयात पी. एच.डी. केली असून ‘अॅक्सेसिब्लिटी फॉरमॅट’चे तंत्रज्ञान “चौर्य”साठी  उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक करणारे पत्र केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरर्मेंट ऑफ पर्सन विथ डिसअॅबिलिटीज’चे संयुक्त सचिव मुकेश जैन यांनी पाठवले असून  या तंत्रज्ञानामुळे दिव्यांगजनही चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत अशी माहिती चित्रपटाचे निर्माते निलेश नवलखा यांनी दिली.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगजनांसाठी ‘सुगम्य भारत अभियान’ (अॅक्सेसिबल इंडिया मिशन) सुरू केले आहे. या माध्यमातून दिव्यांगजनांसाठी विविध सेवा पुरवण्यात येत आहे. आपण चौर्य या चित्रपटात वापरलेले अॅक्सेसिबल फॉरमॅटचे तंत्रज्ञान त्याचाच एक भाग आहे. आपण पुढाकार घेऊन केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. या कामी विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळेल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.’
समीर आशा पाटील हा नव्या दमाचा लेखक दिग्दर्शक या चित्रपटातून पदार्पण करत आहे. अभिनेते किशोर कदम, मिलिंद शिंदे, गणेश यादव, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, दिनेश लता शेट्टी, जयेश संघवी, तीर्था मुरबाडकर आणि आरजे श्रुती आदीं कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या ५ ऑगस्टला चौर्य  हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे .

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra Rent Control Act 1999 Section 28 ambiguous and unfair to tenants
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कलम २८ संदिग्धता आणि भाडेकरूंवर अन्यायकारक