‘वॉर्डरोब मालफंक्शन’मुळे बऱ्याचदा काही कलकारांना लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. विविध पुरस्कार सोहळे किंवा इतर कार्यक्रमांना रेड कार्पेटवर येणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांना याचा सामना करावा लागला आहे. पण, एका प्रसिद्ध वाहिनीवरील कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान असं काहीतरी झाल्यावर नेमकी काय परिस्थिती उद्भवते हे नुकतंच एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळालं.

स्टार प्लस वाहिनीवरील ‘नच बलिये ८’च्या स्टेजवर डान्स करण्याचा मोह न आवरल्यामुळे डान्सर टेरेन्स लुईसला अशाच प्रसंगाला सामोरं जावं लागलं. टेरेन्स डान्स करण्यासाठी ज्यावेळी स्टेजवर आला तेव्हा तो मोठ्या उत्साहात होता. पण, नाचताना अचानक त्याची पँट फाटली. हे लक्षात येताच तो लगेचच मागे गेला त्यावेळी स्टेजवर उपस्थित इतरांनी त्याला सांभाळून घेतलं.

‘नच….’च्या त्या एपिसोडच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासुद्धा स्टेजवर उपस्थित होती. टेरेन्ससोबत घडलेल्या त्या प्रसंगावेळी सोनाक्षीला तिचं हसू आवरता आलं नाही. पण, इतर स्पर्धकांनी मात्र त्याला सावरुन घेत एका जॅकेटने त्याला झाकलं. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टेरेन्स लुईस, सोनाक्षी सिन्हा आणि दिग्दर्शक मोहित सुरी सध्या ‘नच बलिये’च्या ८ व्या पर्वात परिक्षक पदाची धुरा सांभाळत आहेत. सेलिब्रिटी कपल्सच्या नृत्यकौशल्याची झलक पाहायला मिळणाऱ्या या कार्यक्रमाने टीआरपी रेटिंगमध्येही बाजी मारत चांगलं यश मिळवलं आहे.

वाचा: ३६ वर्षीय लहान अभिनेत्रीसोबत रजनीकांत करणार रोमान्स

https://www.instagram.com/p/BUbgRSlh1vD/