क्रिस गेल मैदानात जेवढा आक्रमक दिसतो तेवढाच खऱ्या आयुष्यात तो कूल आहे. त्याला अनेकदा आपण ‘चॅम्पियन’ गाण्यावर डान्स करताना पाहिले आहे. पण आता तो चक्क सनी लिओनीच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. गेलने नुकताच त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो ‘लैला मै लैला’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Photos: असा साजरा केला कतरिनाने तिचा वाढदिवस

या व्हिडिओमध्ये गेलच्या मागे हिरव्या रंगाचा पडदा दिसतो, ज्यावरुन हे स्पष्ट होतं की तो एका जाहिरातीचे चित्रीकरण करत आहे. तो लवकरच एक फुटबॉल टीम खरेदी करण्यासोबतच भारतातील एका स्टार्टअपमध्ये पैशांची गुंतवणूकही करणार आहे. ‘सिक्सर मशीन’ नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू भलेही वेस्टइंडीजसाठी कमी क्रिकेट खेळत असला तरी त्याला २०१७ मध्ये वेगवेगळ्या टी-२० लीगमधून ४५ लाख डॉलर्स मिळाले आहेत तर जाहिरातींमधून जवळपास ३० लाख डॉलर्स मिळालेत.

https://www.instagram.com/p/BWkJpu6hnnx/

गेलने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले की, जो अशाप्रकारे डान्स करेल त्याला तो ५ हजार डॉलर्स देईल. हे अनोखं चॅलेंज पुरुष आणि महिला या दोघांसाठीही आहे. गेलने त्याच्या चाहत्यांना सांगितले की, ते त्यांचे व्हिडिओ #ChrisGayleDanceChallenge या हॅशटॅगने अपलोड करु शकतात. त्यातले सर्वोत्तम पाच व्हिडिओ तो आपल्या पेजवर शेअर करणार. या पाच व्हिडिओंमधून सर्वोत्तम कोण हे मात्र प्रेक्षकच निवडतील. २४ जुलैला क्रिस स्वतः विजेत्याचे नाव घोषित करणार आहे.

Video: ‘झोया, टायगर अभी जिंदा है…’, सलमानचा कतरिनाला दिलासा

गेलने १०३ कसोटी सामन्यांमध्ये ६०.२६ स्ट्राईक रेटसह ७२१४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १५ शतक आणि ३७ अर्धशतकही लगावली आहेत. तर २६९ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १७ वेळा नाबाद राहत २२ शतक आणि ४७ अर्धशतक लगावली आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ९२२१ धावा केल्या आहेत. या ‘सिक्सर मशीन’ने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिनही प्रकारात ४३५ षटकार मारले आहेत.