ते दिवस आता केव्हाच गेले जेव्हा टीव्हीला छोटा पडदा बोललं जायचं. आता हाच छोटा पडदा फार मोठा झाला आहे आणि बॉलिवूडला टक्करही देत आहे. टिव्ही कलाकार आता बॉलिवूडकरांपेक्षा जास्त मानधन घेत आहेत. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची काम करण्याची पद्धतही वेगळी असते. अनेक शिफ्ट्समध्ये त्यांना काम करावं लागतं. मालिकेमधील एक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अनेक महिने, वर्षे लागतात. टिव्हीवरील असाच एक नावाजलेला चेहरा म्हणजे अभिनेते शिवाजी साटम.

सनी लिओनीच्या मुलीने उच्चारलेला पहिला इंग्रजी शब्द!

सोनी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कार्यक्रम सीआयडीमध्ये अभिनेते शिवाजी साटम गेली १९ वर्षे एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारत आहेत. साटम सीआयडीच्या भागांसाठी महिन्यातून फक्त १५ दिवस काम करतात. सीआयडीच्या टीमचे ते फार जुने सहकारी आहेत. साटम यांनी अभिनयाच्या जोरावर एसीपी प्रद्युम्न ही व्यक्तिरेखा अजरामर केली आहे. ‘कुछ तो गडबड है’ हा संवाद ऐकला की आजही डोळ्यासमोर शिवाजी साटम यांचाच चेहरा येतो.

https://www.instagram.com/p/BWf6Jr3l1PN/

पण तुम्हाला हे माहिती आहे का की ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी साटम किती मानधन घेतात ते? ‘जनसत्ता डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, साटम एका एपिसोडचे साधारणपणे १ लाख रुपये घेतात. ते या कार्यक्रमासाठी महिन्यातले १५ दिवस देतात तर उर्वरीत दिवसांत ते सिनेमांचे चित्रीकरण करतात.

…असं काय बोलली कतरिना की एवढा लाजला सलमान खान

https://www.instagram.com/p/BVpv8flF3W4/

साटम यांच्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजनपासूनच झाली होती. यानंतर त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आतापर्यंत त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.