हल्लीच्या चित्रपटांमध्ये काही मजा राहिली नाही असं म्हणत आपली सिनियर पिढी ज्यावेळी त्यांच्या काळातील गाजलेल्या चित्रपटांची उदाहरणं देते त्यावेळी त्यांच्या त्या उदाहरणांच्या यादीत एका चित्रपटाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. तो चित्रपट म्हणजे ‘धरमवीर’. हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘हँडसम हंक’ आणि तगडा अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. आजही टेलिव्हिजनवर हा चित्रपट सुरु असल्यावर चॅनल बदलणारे तसे फार कमीच सापडतील. पण, तुम्हाला माहितीये का, या चित्रपटामध्ये एका बालकलाकाराने अवघ्या काही मिनिटांची भूमिका साकारली होती. त्याची हीच भूमिका त्याला चित्रपटसृष्टीची कवाडं खुली करुन गेली. आजचा ‘सिने’नॉलेजचा प्रश्नही त्याच्याशीच संबंधित आहे.

वाचा : ऐश्वर्याला ‘कोल्हीण’ का म्हणाली कतरिना?

प्रश्न : तुम्हाला माहितीये का ‘धरमवीर’ चित्रपटातील ‘हा’ बालकलाकार कोण आहे?
१. अभिषेक बच्चन<br />२. बॉबी देओल
३. सनी देओल

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध अभिनेत्यांपैकीच एक अभिनेता म्हणजे धर्मेंद्र. ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नसराली येथे जन्मलेल्या धर्मेंद्र यांना बॉलिवूडमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवरही टाईम्स मासिकाने जगातील सर्वात जास्त सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्यांमध्ये धर्मेंद्र यांच्या नावाचाही समावेश केला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील या रांगड्या अभिनेत्याचं खरं नाव आहे धरम सिंग देओल. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा इतिहास पाहिला तर, अनेकांना या अभिनेत्याचा हेवा वाटल्यावाचून राहणार नाही. त्यातही धरमजींच्या काही चित्रपटांनी तर प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवली होती. मनमोहन देसाई यांचं दिग्दर्शन असणाऱ्या ‘धरमवीर’ या चित्रपटात धर्मेंद्र, झिनत अमान, जितेंद्र, नीतू सिंग, प्राण, रंजित या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातून मनमोहन देसाई यांनी प्रेक्षकांना एका वेगळ्याच दुनियेची सफर घडवली होती.

वाचा : ‘त्या’ रेल्वे प्रवासामुळे शाहरूख पुन्हा एकदा अडचणीत

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
प्रश्न- तेजाब चित्रपटात माधुरी दीक्षितचे नाव काय होते?
– मोहिनी