कलाकार आणि चित्रपट रसिकांमध्ये असणारं निखळ मनोरंजनाचं नातं याविषयी सांगावं आणि ऐकावं ते नवलंच. काही रसिकांसाठी तर चित्रपट, कलाकार आणि ही झगमगती दुनिया इतकी जवळची असते की, कोणत्याही चित्रपटाचं नाव घ्या…, कलाकाविषयीची माहिती विचारा.. उत्तर देण्यासाठी या अशा रसिकांचा हात नेहमीच वर असतो. त्यातही काही चित्रपटांच्या बाबतीत तर अनेकांनाच विशेष आपुलकी आहे. या अशा मंडळींसाठी आहे आजचा सिने‘नॉलेज’चा प्रश्न..

‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटामध्ये आमिर खानच्या (संजू) कॅफेचं नाव काय होतं?
पर्याय-
१. मॉडर्न कॅफे
२. हिल व्ह्यू कॅफे
३. रामलाल्स कॅफे

१९९२ मध्ये प्रदर्शित झालेला एक ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे मन्सूर खान दिग्दर्शित ‘जो जिता वही सिकंदर’. आमिर खान, आएशा झुल्का, मामिक सिंह, दीपक तिजोरी आणि कुलभूषण खरबंदा अशा कलाकारांची फौज घेऊन नव्वदच्या दशकात तरुणाईला वेड लावणाऱ्या या चित्रपटाने रसिकांच्या मनात कायमचं घर केलं. आजही हा चित्रपट अनेकांच्या फेव्हरिट लिस्टचा भाग आहे. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या कारकिर्दीतील या महत्त्वाच्या चित्रपटामध्ये त्याच्या कॅफेनेही अनेकांना आकर्षित केलं. किंबहुना हा कॅफेसुद्धा चित्रपटाचा महत्त्वाचा भाग होता असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला त्या कॅफेचं नाव आठवतंय का? ज्या कॅफेतून ‘रतन’ आणि ‘कल्पना’चं प्रेम बहरलं… ज्या कॅफेत बसून ‘संजू’ आणि त्याचे मित्र खट्याळपणा करायचे…. काही आठवतंय का?

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
प्रश्न- सिने’नॉलेज’ : ‘कहो ना प्यार है..’ सिनेमात हृतिक काय नाश्ता करतो?
उत्तर- ऑमलेट