आशुतोष गोवारीकर हे नाव घेतलं की त्याने दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे आठवतात. त्यातही ‘लगान’ आणि ‘जोधा अकबर’, ‘मोहेंजोदारो’ हे सिनेमे चटकन डोळ्यांसमोर येतात.

लार्जर दॅन लाइफ सिनेमे करायला आशुतोषला नेहमीच आवडते. त्याचे अनेक सिनेमे वादातही अडकले होते. पण त्या सर्व प्रकरणाचा त्याच्या दिग्दर्शनावर कधीच परिणाम झाला नाही. ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमातून तर त्याने तो उत्तम अभिनयही करू शकतो हेच दाखवून दिलं होतं. पण जर तुम्ही आशुतोष गोवारीकरचे कट्टर चाहते असाल तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक प्रश्न आहे. तुम्हाला आशुतोष गोवारीकरने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा आठवतोय का असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल…

चला हे उत्तर शोधून काढण्यासाठी आम्ही तुम्हाला थोडीशी मदत करतो.

पर्याय
१. लगान
२. स्वदेश
३. अफसाना प्यार का
४. जंग

या चार सिनेमांपैकी आशुतोषने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा कोणता ते आम्हाला सांगा..

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
रिमा लागू-अशोक सराफ यांच्या या चित्रपटाचे नाव ओळखा?
उत्तर – आपली माणसं