मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचं विद्यापीठ असा उल्लेख केला की ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं नाव आपसुकच डोळ्यासमोर येतं. केवळ मराठी चित्रपटांमध्येच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडत या अभिनेत्याने सर्वांनाच दखल घ्यायला लावली. मराठी चित्रपटांची धुरा एकेकाळी ज्या निवडक कलाकारांच्या खांद्यावर होती त्यातले अशोक सराफ हे खमकं नाव. रंगभूमी, मालिका किंवा चित्रपट असो प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. विनोदाचा बादशहा असलेला हा अभिनेता ‘शेंटिमेंटल’ या आगामी मराठी चित्रपटामधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटात ते कॉन्स्टेबलची भूमिका करतायत. मराठी चित्रपटांतून त्यांनी केलेली पांडू हवालदारची भूमिका गाजली होती. ‘शेंटिमेंटल’ चित्रपटापर्यंत पोहोचता पोहोचता आता त्यांचं प्रमोशन झालं असून, ते यात कॉन्सेटबलच्या भूमिकेत दिसतील.

वाचा : महिला टीम इंडियाला हुमा देणार बिर्याणी पार्टी

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

४ जून १९४७ रोजी जन्मलेल्या अशोक सराफ यांनी ६०च्या दशकात चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. ७०च्या दशकात ते दादा कोंडके, नीळू फुले, अविनाश मसुरेकर, राजा गोसावी यांसारख्या मोठ्या कलाकारांसह काम करताना दिसले. त्यावेळी त्यांनी बहुतेकदा सहाय्यक भूमिका केल्या. पण, १९८० पासून ते चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे या चौकडीने विनोदाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन पोहचवले.

प्रश्न- अशोक सराफ यांचा पहिला चित्रपट कोणता?
पर्याय
१. पांडू हवालदार
२. दोन्ही घरचा पाहुणा
३. जानकी

वाचा : सुनील शेट्टीचे मुंबईतील बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क

अशोक सराफ यांनी जवळपास २५० चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘एक डाव भूताचा’, ‘धूम धडाका’, ‘गंमत जंमत’, ‘अशी ही बनवा बनवी’, ‘वझिर’ अशा कित्येक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय. १९७७ साली त्यांना ‘राम राम गंगाराम’ चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तर ‘पांडू हवालदार’ चित्रपटासाठी भारत सरकारने त्यांचा सन्मान केला होता. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि भोजपुरी चित्रपटातही काम करणाऱ्या या अभिनेत्याला ‘मायका बिटुआ’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता.

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
प्रश्न- ‘तूम मिले दिल खिले..’ हे गाणे कोणी गायले आहे?
उत्तर- कुमार सानू