राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शन केलेला ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झालेला. या चित्रपटामध्ये मि. परफेक्शनिस्ट आमिर खान, सिद्धार्थ नारायण, शर्मन जोशी, आर. माधवन, सोहा अली खान, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी तसेच ब्रिटिश अभिनेत्री ॲलिस पॅटन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

वाचा : आमिरची ‘दंगल’ अजूनही सुरूच, चित्रपटाने गाठला आणखी एक पल्ला

भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, शिवराम हरी राजगुरू, अशफाक उल्ला खान व राम प्रसाद बिस्मिल या थोर स्वातंत्र्यसेनान्यांवर चित्रपट काढण्याचे स्वप्न घेऊन एक ब्रिटिश तरुणी नवी दिल्लीमध्ये येते. तेथे तिची गाठ कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि वैचारिक दृष्ट्या भरकटलेल्या काही तरुणांशी पडते. या तरुणांना आपल्या चित्रपटात घेण्याचा निर्धार सू मॅकिनली (अॅलिस) करते. आमिर तिच्या चित्रपटात चंद्रशेख आझाद यांची भूमिका साकारतो. पण, चित्रपटात त्याने साकारलेल्या मुख्य भूमिकेचे नाव काय होते ते तुम्हाला ओळखायचे आहे.

प्रश्न – आमिरने ‘रंग दे बसंती’मध्ये साकारलेल्या भूमिकेचे नाव काय?
पर्याय
१. करण
२. असलम
३. दलजित

वाचा : न्यूटन’च्या ऑस्करवारी निमित्ताने..

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी जवळपास सात वर्षे ‘रंग दे बसंती’च्या कथेवर काम केले होते. आपल्या चित्रपटांची निवड अगदी चौकसपणे करणाऱ्या आमिरने ‘रंग दे बसंती’ची कथा ऐकताच त्यात काम करण्यासाठी एका क्षणात होकार दिला होता. या चित्रपटाला ५३व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
राजेश खन्ना यांना नाव बदलण्यास कोणी सांगितले होते?
उत्तर – काका